कॅनडा : नुकतंच एलोन मस्क (Elon Musk) यांनी Twitter कंपनी विकत घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यातून चर्चाही बरीच झाली. मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर सीईओ पराग अग्रवाल (CEO, Parag Agarwal) यांनी ट्विटरच्या भविष्याबद्दल एक सूचक ट्विटही केले. त्यानंतर ते ट्रोलही झाले.
आता ट्विटर विकत घेतल्यानंतर एलोन मस्क यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत कोका-कोला कंपनी विकत (Buy CocaCola Company) घेण्याची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. त्यात त्यांनी कंपनी विकत घेतल्यानंतर त्यात ते कोकेन (Cocaine) मिसळणार असल्याचंही त्यांनी याच ट्विटमध्ये नमूद केलंय.
Next I’m buying Coca-Cola to put the cocaine back in
— Elon Musk (@elonmusk) April 28, 2022
त्यांनी भविष्यात कंपनी विकत घेतल्यानंतर ते आता ते आपला दिलेला शब्द पाळणार की, फक्त त्यांनी गंमत म्हणून असं ट्विट केलं आहे. हे येणारा काळच ठरवेल परंतु जर त्यांनी आपलं म्हणणं खरं केलं तर अनेक जण याच्या आहारी जाऊन आणखी किती पिढ्या देशोधडीला लागणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.
[read_also content=”हनुमान चालिसा वादातून मुंबईत १९९३ ची पुनरावृत्ती करण्याचा कट…नवनीत राणा या ‘प्यादे’ आहेत : संजय राऊत https://www.navarashtra.com/maharashtra/navneet-rana-as-a-pawns-sanjay-raut-counter-attack-on-hanuman-chalisa-controversy-nrvb-273916/”]
एलोन मस्क यांनी केलेल्या या ट्विटला ट्विटरकरांनी रिप्लाय, रिट्विट आणि लाईक्सला छप्पर फाडके प्रतिसाद देत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.