Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Tesla Roadster Car Launch : एलॉन मस्कच्या टेस्लाने एका नवीन रोडस्टर कारचे अनावरण केले आहे, जी रॉकेट-शक्तीवर चालणारी आवृत्ती असून उडू शकते असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने यासाठी नोंदणी सुरू केली असून २०२८ मध्ये उत्पादन सुरू करण्याची योजना आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 16, 2026 | 06:42 PM
Tesla Roadster 2 flying car Elon Musk flying car video

Tesla Roadster 2 flying car Elon Musk flying car video

Follow Us
Follow Us:
  • डणारी आणि रॉकेट-शक्तीची कार
  • तीन शक्तीशाली व्हेरिएंट्स
  • २०२८ मध्ये उत्पादन आणि बुकिंग सुरू

अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क आणि त्यांच्या टेस्ला (Tesla) या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपनीने ऑटोमोबाईल जगतामध्ये पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. गुरुवारी टेक्सास येथील स्पेसएक्स (SpaceX) च्या चाचणी केंद्रावर एका भव्य प्रात्यक्षिकादरम्यान टेस्लाने आपल्या बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर 2’ (Roadster 2) सुपरकारचे अनावरण केले. ही कार केवळ रस्त्यावर वेगाने धावणार नाही, तर चक्क हवेत झेप घेऊ शकते, असा थरारक दावा कंपनीने केला असून या प्रात्यक्षिकाचा व्हिडियो जगभरात प्रचंड व्हायरल झाला आहे.

संरक्षण मंत्र्यांचे स्पष्ट शब्द: संवाद इच्छितो, पण कमजोरी मानू नका

जवळपास एका दशकाच्या प्रतीक्षेनंतर टेस्लाने या रोडस्टर कारचा प्रत्यक्षात थरार दाखवला आहे. या कारमध्ये ऑटोमोबाईल आणि एरोस्पेस (विमान व रॉकेट) तंत्रज्ञानाचा अद्भूत संगम पाहायला मिळतो. इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीतील रॉकेट तंत्रज्ञानाचा वापर करून या कारमध्ये विशेष ‘कोल्ड-गॅस थ्रस्टर्स’ (Cold-Gas Thrusters) बसवण्यात आले आहेत, जे कारला जमिनीवरून थेट हवेत उचलण्याचे आणि नियंत्रित करण्याचे काम करतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?

तीन वेगळे व्हेरिएंट्स आणि थक्क करणारे तंत्रज्ञान

टेस्लाने ही सुपरकार मुख्यतः तीन वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये बाजारात आणण्याची योजना आखली आहे:

परफॉर्मन्स (Performance),

थ्रस्ट (Thrust) आणि

रॉकेट (Rocket)

‘परफॉर्मन्स’ व्हेरिएंट हे रस्त्यावर दैनंदिन वापरासाठी ‘रोड-रेडी’ (Road Ready) मॉडेल म्हणून डिझाइन केले गेले आहे. यानंतर येणारे ‘थ्रस्ट’ व्हेरिएंट हे रेसिंग प्रेमींसाठी ‘रेस-रेडी’ (Race Ready) आहे. थ्रस्ट व्हेरिएंटमध्ये मागील बाजूस एअर थ्रस्टर्स आणि खालच्या बाजूला विशेष ‘सक्शन सिस्टीम’ (Suction System) बसवली आहे. ही सिस्टीम कारच्या खालून हवा खेचून सुमारे २G एवढा प्रचंड डाऊनफोर्स निर्माण करते. यामुळे कार अगदी थांबलेल्या स्थितीतही किंवा वेगवान असताना उलट्या पृष्ठभागांना घट्ट रोवून राहू शकते. इतकेच नाही, तर थ्रस्ट मॉडेल अवघ्या ०.८१ सेकंदात ० ते १०० किमी/तास इतका तुफानी वेग गाठू शकते.

हवेत झेप घेणारे ‘रॉकेट व्हेरिएंट’: १-सीटर फ्लाईंग सुपरकार

या तिन्ही मॉडेल्समध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारे मॉडेल म्हणजे ‘रॉकेट व्हेरिएंट’ (Rocket Variant). टेस्लाने या मॉडेलला ‘एयर-रेडी’ (Air Ready) श्रेणीत ठेवले आहे. हे विशेष १-सीटर मॉडेल असून कारच्या सभोवताली तब्बल १० हाय-प्रेशर कोल्ड-गॅस थ्रस्टर्स बसवले आहेत. ६०० लिटर क्षमतेच्या अल्ट्रा-हाय प्रेशर एअर टँकमधून बाहेर पडणाऱ्या हवेच्या प्रचंड दबावामुळे ही कार हवेत काही सेकंद तरंगू शकते, कसरती करू शकते आणि पुन्हा सुरक्षितपणे जमिनीवर उतरू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

प्रात्यक्षिकादरम्यान या कारने टेस्लाच्या संपूर्ण लाईनअप आणि सायबरट्रकवरून (Cybertruck) हवेत उंच उडी मारून दाखवली, ज्यामुळे उपस्थितांचे डोळे दिपले. विशेष म्हणजे, ऑटोपायलट आणि ड्रायव्हरलेस कार बनवणाऱ्या टेस्लाची ही एकमेव अशी सुपरकार असेल, जी चालक पूर्णपणे मॅन्युअली चालवू शकतील.

Holy smokes https://t.co/rTnRobllwc — Tesla (@Tesla) October 16, 2026

credit – social media and Twitter

बुकिंग सुरू; २०२८ मध्ये प्रत्यक्ष रस्त्यावर आणि हवेत दिसणार कार

टेस्लाने या बहुचर्चित सुपरकारसाठी जागतिक स्तरावर आरक्षण (Booking) सुरू केले आहे. ‘परफॉर्मन्स’ मॉडेलसाठी ग्राहकांना ५०,००० डॉलर्स (सुमारे ₹४८ लाख) अनामत रक्कम देऊन बुकिंग करता येईल, तर ‘थ्रस्ट’ मॉडेलसाठी २,५०,००० डॉलर्सचा डिपॉझिट भरावा लागेल. सर्वात उच्च श्रेणीतील ‘रॉकेट’ मॉडेल हे केवळ खास निमंत्रणाद्वारेच (Invite-Only) उपलब्ध करून दिले जाणार आहे.

कंपनीच्या मते, या कारचे अधिकृत व्यावसायिक उत्पादन २०२८ मध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि थरारक तांत्रिक झेप मानली जात आहे.

Web Title: Tesla roadster 2 flying car unveil elon musk spacex thrusters booking 2028 hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • elon musk
  • Tesla
  • viral video
  • World news

संबंधित बातम्या

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
1

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
2

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Bangladesh: नवरात्रीच्या काळात बांगलादेशात मंदिरासमोर चिथावणीखोर कृत्य; मंदिरासमोर गायी कापून शिजवल्याचा गंभीर आरोप
3

Bangladesh: नवरात्रीच्या काळात बांगलादेशात मंदिरासमोर चिथावणीखोर कृत्य; मंदिरासमोर गायी कापून शिजवल्याचा गंभीर आरोप

Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?
4

Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.