
फोटो सौजन्य सोशल मीडिया
अमेरिकेत टोकाचे खाजगीकरण असल्याने समाज व्यवस्था भारता पेक्षा वेगळी आहे . मध्यंतरी ट्रम्प आणि मस्क यांच्यात झालेल्या वादामुळे मस्क ट्रम्प यांना कधीच पाठिंबा देणार नाहीत अशी हवा निर्माण झाली होती पण पडद्यामागे काही घटना घडल्या असून मस्क यांनी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला भरगोस देणगी दिली आहे .
या निवडणुकीत अब्जाधीशांची देणगी देण्याची भूमिका महत्वाची ठरत आहे . उद्योगपती इलॉन मस्क यांनी रिपब्लिकन पक्षांशी संबंधित गटांना तब्बल २५० दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली आहे . काँग्रेसमधील बहुमत टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला मस्क यांच्या या आर्थिक पाठबळामुळे मोठी मदत मिळण्याची शक्यता आहे .
मध्यावधी निवडणुकांमध्ये काँग्रेसमधील आपले बहुमत टिकवून ठेवणे हे रिपब्लिकन पक्षासमोर मोठे आव्हान आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पक्षाला निवडणूक प्रचार अधिक आक्रमकपणे राबवावा लागणार आहे. अशा वेळी मस्क यांच्याकडून मिळालेला मोठा निधी पक्षाच्या प्रचार मोहिमेला आर्थिक बळ देऊ शकतो.
अमेरिकेतील निवडणुकांमध्ये अब्जाधीश आणि मोठ्या उद्योगपतींच्या देणग्यांचा प्रभाव सातत्याने चर्चेचा विषय राहिला आहे. मोठ्या आर्थिक देणग्यांमुळे राजकीय पक्षांना प्रचारासाठी अधिक संसाधने उपलब्ध होतात. मात्र, यामुळे धोरणात्मक निर्णयांवर श्रीमंत देणगीदारांचा प्रभाव वाढतो का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये मस्क यांचा आर्थिक पाठिंबा रिपब्लिकन पक्षासाठी किती फायदेशीर ठरतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मध्यावधी निवडणुकांमध्ये काँग्रेसमधील आपले बहुमत टिकवून ठेवणे हे रिपब्लिकन पक्षासमोर मोठे आव्हान आहे . सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पक्षाला निवडणूक प्रचार अधिक निवडणूक प्रचार अधिक आक्रमकपणे राबवावा लागणार आहे . अशा वेळी मस्क यांच्याकडून मिळालेला मोठा निधी पक्षाचा प्रचार मोहिमेला आर्थिक बळ देऊ शकतो .