
Epstein files accuse Trump of assaulting woman and secret travel on private jet
Jeffrey Epstein Files Trump rape allegations 2025 : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा एका जुन्या आणि वादग्रस्त प्रकरणाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन (Jeffrey Epstein) याच्याशी संबंधित सुमारे ३०,००० पानांची नवीन कागदपत्रे अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) मंगळवारी रात्री सार्वजनिक केली. या फाइल्समध्ये ट्रम्प यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, या आरोपांची सत्यता अद्याप सिद्ध झालेली नाही. या फाईल्समुळे अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा नैतिकतेचा आणि कायदेशीर चौकशीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आजवर अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे की, त्यांचा एपस्टाईनच्या खाजगी जेटशी किंवा ‘लोलिता एक्सप्रेस’शी कोणताही संबंध नव्हता. मात्र, नवीन कागदपत्रांमधील उड्डाण नोंदी (Flight Logs) काही वेगळीच कथा सांगत आहेत. जानेवारी २०२० च्या एका ईमेलमधील पुराव्यानुसार, १९९३ ते १९९६ या काळात ट्रम्प यांनी किमान आठ वेळा एपस्टाईनच्या विमानातून प्रवास केला होता. धक्कादायक म्हणजे, काही प्रवासांमध्ये त्यांच्या तत्कालीन पत्नी मार्ला मॅपल्स आणि मुले देखील सोबत होती. या उड्डाणांमुळे ट्रम्प आणि एपस्टाईन यांच्यातील संबंध पूर्वी वाटत होते त्यापेक्षा कितीतरी अधिक जवळचे होते, हे स्पष्ट होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : LVM3-M6 : मोफत इंटरनेटच्या दिशेने ISROचे लक्षणीय पाऊल; ‘Bluebird-2 Satellite’ मुळे होणार स्मार्टफोन क्रांती, वाचा कसे?
फाइल्समधील नोंदीनुसार, ट्रम्प यांनी केलेल्या आठपैकी चार प्रवासात एपस्टाईनची मुख्य सहकारी घिसलेन मॅक्सवेल देखील उपस्थित होती. मॅक्सवेल ही सध्या मानवी तस्करीच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. १९९३ मधील एका विशिष्ट उड्डाणाचा उल्लेख या कागदपत्रांत आहे, ज्यामध्ये विमानात फक्त एपस्टाईन, ट्रम्प आणि एक २० वर्षांची अज्ञात महिला होती. या महिलेची ओळख गुप्त ठेवण्यात आली असून, अशा प्रकारच्या अनेक सहलींमध्ये अशा महिलांचा समावेश होता ज्यांना नंतर कायदेशीर प्रक्रियेत साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले होते.
23.12.25 “BREAKING: Epstein files leaked from DOJ, reveal FBI intake report from 2020 with individual claiming Donald Trump raped them & feared for their lives” source:THREADShttps://t.co/xHSwrnj1hm pic.twitter.com/qEcEe3wGqo — Patrick Emek (@14wombat1) December 23, 2025
credit : social media and Twitter
या सर्व खुलाशांमध्ये सर्वात मोठा धक्का म्हणजे ऑक्टोबर २०२० मधील एक एफबीआय फाइल. यात एका महिलेने दावा केला आहे की, डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टाईन या दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच एका लिमोझिन ड्रायव्हरच्या निवेदनाचाही त्यात उल्लेख आहे, ज्याने १९९५ मध्ये ट्रम्प यांनी एका मुलीवर अत्याचार केल्याची चर्चा ऐकली होती. मात्र, न्याय विभागाने (DOJ) यावर महत्त्वाची टीप दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे आरोप पुराव्याविना आहेत आणि २०२० च्या निवडणुकीपूर्वी राजकीय हेतूने देखील सादर केले गेले असावेत. तसेच, हे आरोप करणाऱ्या महिलेचा नंतर संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने या प्रकरणाचा तपास करणे कठीण झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : श्रीमंतीच्या आड लपलेला सैतान! पाहा कसा होता ‘Jeffrey Epstein’ च्या ‘Lolita Express’ आणि ‘पीडोफाईल आयलंड’चा थरार?
या ३०,००० पानांच्या तावडीत एपस्टाईनचे एक कथित हस्तलिखित पत्रही सापडले आहे, ज्यामध्ये त्याने ट्रम्प यांच्याबद्दल अत्यंत अपमानास्पद आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मात्र, न्याय विभागाने या पत्राच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सध्याच्या स्थितीत ट्रम्प यांच्यावर या प्रकरणात कोणताही अधिकृत गुन्हेगारी खटला चालवला जात नाहीये. तरीही, या कागदपत्रांमुळे ट्रम्प यांच्या प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Ans: नवीन फ्लाईट रेकॉर्ड्सनुसार, ट्रम्प यांनी १९९३ ते १९९६ दरम्यान किमान ८ वेळा जेफ्री एपस्टाईनच्या खाजगी विमानाने प्रवास केला होता.
Ans: नाही, अमेरिकन न्याय विभागाने (DOJ) स्पष्ट केले आहे की हे आरोप विनापुराव्याचे (Unverified) आहेत आणि ते सिद्ध झालेले नाहीत.
Ans: न्याय विभागाने या प्रकरणात सुमारे ३०,००० पानांची नवीन कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत.