
फोटो सौजन्य सोशल मीडिया
Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी
UNGA मधील भाषणात पेझेश्कियान यांनी युद्धाचा विस्तार झाल्यास त्याचे परिणाम केवळ दोन देशांपुरते मर्यादित राहणार नसल्याचे अधोरेखित केले. इराण संघर्षाच्या परिस्थितीतही आत्मसमर्पण करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, संघर्ष संपवण्यासाठी राजनैतिक मार्गावर विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.
World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला
होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक ऊर्जा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग आहे. पेझेश्कियान यांनी या जलमार्गावर इराणच्या हितांकडे दुर्लक्ष करून इतरांना फायदा मिळू शकत नाही, असा मुद्दा मांडला. शत्रुत्वपूर्ण नौदलांची कायमस्वरूपी तैनाती आणि युद्धाचा विस्तार शांतता निर्माण करणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
China Nail Industry : रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब
इराण आणि अमेरिकेदरम्यान तणाव वाढलेला असतानाच न्यूयॉर्कमध्ये राजनैतिक हालचाली सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही चर्चेत प्रगती होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एका बाजूला लष्करी संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला राजनैतिक प्रयत्न अशी दुहेरी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. मात्र, दोन्ही देशांमधील मतभेद कायम असून अंतिम करार अद्याप झालेला नाही.