
फोटो सौजन्य AI
अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी संबंधित चर्चेत सहभाग घेतला . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत करारासाठी मोमेंटम निर्माण झाल्याचे म्हंटले आहे . मात्र इराणने आपल्या प्रमुख अटी मागे घेतल्याचे स्पष्ट संकेत दिलेले नाहीत . त्यामुळे चर्चेचा पुढील टप्पा निर्णायक ठरणार आहे .
Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी
न्यूयॉर्कमध्ये झालेली चर्चा थेट ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्यात झालेली नाही . कतरने मध्यस्थीची भूमिका बजावत अमेरिकन आणि इराणी प्रतिनिधींमध्ये संदेशाची देवाणघेवाण केली . अमेरिकेच्या म्हणण्यानुसार मध्यस्थांनी दोन्ही बाजूंमध्ये सतत ये जा करत जा चर्चा पुढे नेली .
ही चर्चा सुमारे तीन तास चालली . अमेरिकेच्या प्रतिनिधी ती रचनात्मक आणि आशादायक असल्याचे म्हंटले तर इराणने या संपर्काचा उपयोग आपली भूमिका आणि अटी अमेरिकेपर्यंत पोहोचवण्यासाठी झाल्याने सांगितले आहे .
China Nail Industry : रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब
इराणने संघर्ष थांबवणे , अमेरिकेची नौदल नाकेबंदी आणि आर्थिक दबाव करणे तसेच गोठवलेली इराणी मालमत्ता मुक्त करण्यासारख्या मुद्यांवर भर दिला आहे . खासकरून होर्मूझ समुद्रधुनीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे .
जगातील महत्वाच्या ऊर्जा वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या या सामुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये तोडगा काढणाचा प्रयत्न सुरु आहे . मात्र इराणने आपल्या पूर्वीच्या अटी सोडल्याचे मान्य केलेले नाही .
World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ट्रम्प यांनी इराणविरोधात कठोर भूमिका मांडतानाच कराराची शक्यता असल्याचेही संकेत दिले. त्यानंतर न्यूयॉर्कमधील चर्चेमुळे राजनैतिक मार्ग पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. मात्र, दोन्ही देशांच्या अधिकृत भूमिकांमध्ये अद्याप मोठी तफावत आहे.
इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियन महासभेला संबोधित करताना आपल्या देशाची भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे पुढील चर्चांमध्ये युद्धविराम, होर्मुझमधील वाहतूक, आर्थिक निर्बंध आणि सुरक्षाविषयक हमी हे मुद्दे महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. सध्या चर्चेने संवादाचा मार्ग खुला केला असला तरी अंतिम करार झाल्याचे सांगता येणार नाही.