Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ethiopia News : इथिओपियात चर्चवर सशस्त्र हल्ले; ४० हून अधिक जणांचा मृत्यू

Ethiopia News : इथिओपियातील ओरोमिया प्रांतात दोन वेगवेगळ्या सशस्त्र हल्ल्यांत ६० जणांचा मृत्यू झाला आहे. २० हून अधिक घरे जाळण्यात आली असून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यांवरून सरकार आणि बंडखोरांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 27, 2026 | 06:13 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • दोन हल्ल्यांत ६० जणांचा मृत्यू
  • चर्च आणि गावांना लक्ष्य; नागरिकांमध्ये भीती
  • सरकार आणि बंडखोरांमध्ये आरोप-प्रत्यारोप
Ethiopia News :आफ्रिकेतील इथिओपिया देशात धार्मिक आणि राजकीय संघर्षाने पुन्हा गंभीर वळण घेतले आहे. देशातील ओरोमिया प्रांतात चर्च आणि गावांना लक्ष्य करून सशस्त्र हल्ले करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये किमान ६० जणांचा मृत्यू झाला आहे.

इथिओपियन ऑर्थोडॉक्स तेवाहेडो चर्चने ही माहिती दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन समुदायातील नागरिकांचा समावेश आहे. अनेक घरे जाळण्यात आली असून २० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

दोन हल्ल्यांत ६० जणांचा मृत्यू

चर्चने दिलेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर रोजी मेर्ती जिल्ह्यातील हल्ल्यात १४ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी शेरका जिल्ह्यातील टेरेटा, चोले आणि बिरबो परिसरात दुसरा भीषण हल्ला झाला. या हल्ल्यात तब्बल ४६ जणांना जीव गमवावा लागला.

अशा प्रकारे दोन्ही घटनांमध्ये मृतांचा एकूण आकडा ६० वर पोहोचला आहे. हल्ल्यांमध्ये २० हून अधिक घरे जाळण्यात आली असून २० पेक्षा अधिक नागरिकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Virus Alert : टेन्शन वाढलं ;दशकांपासून प्राण्यांमध्ये असलेला विषाणू माणसात दाखल; फ्रान्समध्ये पहिली नोंद

चर्च आणि गावांना लक्ष्य; नागरिकांमध्ये भीती

सशस्त्र हल्लेखोरांनी गावांमध्ये घुसून नागरिकांना लक्ष्य केले. दोन चर्चवरही हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अनेक घरांची जाळपोळ करण्यात आल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या हिंसाचारामुळे परिसरातील कुटुंबांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिक सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या प्रयत्नात आहेत. धार्मिक समुदायाला लक्ष्य करून हल्ले होत असल्याची चिंता चर्चच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Tech Explosion : अमेरिकेत टेक्नॉलॉजीचा महाविस्फोट; कोट्यवधी नागरिकांच्या घराजवळ उभी राहणार डेटा सेंटर्स

सरकार आणि बंडखोरांमध्ये आरोप-प्रत्यारोप

या हल्ल्यांमागे नेमके कोण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. ओरोमिया प्रादेशिक सरकारने या हल्ल्यांसाठी बंडखोर गटांशी संबंधित आघाडीला जबाबदार धरले आहे. दुसरीकडे, बंडखोर आघाडीशी संबंधित सूत्रांनी सरकारवरच गंभीर आरोप केले आहेत. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, इथिओपियन मानवाधिकार आयोगाने या घटनेची दखल घेत परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. चर्चने सरकारकडे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Ethiopia news armed attacks on churches in ethiopia more than 40 people dead cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Africa Continent
  • Marathi News
  • religion news

संबंधित बातम्या

Top Casting Directors: हॉलिवूड ते बॉलिवूड! मोठ्या चित्रपटांची स्टारकास्ट घडवणारे ‘मास्टरमाइंड’ कोण?
1

Top Casting Directors: हॉलिवूड ते बॉलिवूड! मोठ्या चित्रपटांची स्टारकास्ट घडवणारे ‘मास्टरमाइंड’ कोण?

Dharau Marathi Film: गौरक्षणाचा विषय, मराठी सिनेमाची भरारी! ‘धाराऊ’ची पुणे-विदर्भात हाऊसफुल्ल कामगिरी
2

Dharau Marathi Film: गौरक्षणाचा विषय, मराठी सिनेमाची भरारी! ‘धाराऊ’ची पुणे-विदर्भात हाऊसफुल्ल कामगिरी

Aata Hou De Dhingana: स्टार प्रवाहचा मोठा निर्णय, ‘आता होऊ दे धिंगाणा’ मधला फेमस गेम बंद
3

Aata Hou De Dhingana: स्टार प्रवाहचा मोठा निर्णय, ‘आता होऊ दे धिंगाणा’ मधला फेमस गेम बंद

Nagpur Crime : शेंगांचा ठेला ते एमडीचा धंदा; ३०० रुपये रोज कमावणारा ‘फल्ली’ कसा बनला कोट्यधीश
4

Nagpur Crime : शेंगांचा ठेला ते एमडीचा धंदा; ३०० रुपये रोज कमावणारा ‘फल्ली’ कसा बनला कोट्यधीश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.