External Affairs Minister S Jaishankar and China President Xi Jinping meet in Beijing before SCO meeting
बिजिंग : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या चीनच्या अधिृत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान भारत आणि चीनमधील संबंधांवर चर्चा सुरु आहे. या दौऱ्यावर संपूर्ण जगाचे लक्ष्य लागले आहे. दरम्यान एस. जयशंकर यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली आहे.
ही भेट शांघाय सहकार संघटनेच्या पार्श्वभूमीवर झाली. गेल्या २० दिवस चीनचे अध्यक्ष कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित नव्हते. तसेच जिनपिंग यांनी ब्रिक्स परिषदेलाही उपस्थिती लावली नव्हती. त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, २० दिवसांनंतर शी जिनपिंग एस. जयशंकर यांच्यासोबत दिसून आले. यामुळे त्यांच्या तब्येत खराब असल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळला आहे.
एस जयशंकर यांनी या भेटीची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन दिली. त्यांनी म्हटले की, “आज सकाळी बिजिंगमध्ये SCO परराष्ट्र मंत्र्यासोबत बैठक झाली. यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट झाली. यावेळी मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांचा शुभेच्छा संदेश त्यांना दिली. भारत आणि चीन संबंधांमध्ये प्रगती होत आहे. या संबंधांमध्ये आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व मी अधोरेखित केले.”
या भेटीचा प्रमुख उद्देश भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये अधिक सुधारणा करणे होता. चीनमध्ये झालेल्या SCO बैठकीदरम्यान भारत, रशिया, पाकिस्तान, इराणसह मध्य आशियाई देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.
Called on President Xi Jinping this morning in Beijing along with my fellow SCO Foreign Ministers. Conveyed the greetings of President Droupadi Murmu & Prime Minister @narendramodi. Apprised President Xi of the recent development of our bilateral ties. Value the guidance of… pic.twitter.com/tNfmEzpJGl — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) July 15, 2025
SCO शांघाय सहकार संघटना ही एक राजकीय आर्थिक आणि सुरक्षा क्षेत्रातील बहुपक्षीय संघटना आहे. या संघटनेमध्ये ९ देशांचा समावेश आहे. तसेच अनेक पर्यवेक्षक संवाद भागीदार देशांचा देखील यामध्ये समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे एका महिन्यात या संघटनेची ही दुसरी बैठकी आहे. यापूर्वी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ही बैठक घेतली होती. या बैठकीत भारताने संयुक्त निवेदनावर सहमती दर्शवली होती. भारताने दहशतवादविरोधी ठाम भूमिका घेतली होती. विशेष करुन २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली होती.
Good to meet IDCPC Minister Liu Jianchao in Beijing. Discussed the changing global order and the emergence of multipolarity. Spoke about a constructive India-China relationship in that context. pic.twitter.com/g8BplRMcrc — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) July 14, 2025