FedEx Plane Emergency Landing after engine catches fire mid-air
वॉशिंग्टन: अमेरिकेत एकामागून एक विमान अपघातांच्या भयानक घटना घडत आहेत. याचदरम्यान एक मोठा अपघात होता होता टळला आहे. शनिवारी (01 मार्च ) फेडेक्सचे मालवाहू विमानाने नेवार्क विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्याचे आपात्कालीन लॅंडिग करावे लागले. उड्डाणादरम्यान विमानाला पक्षी धडकल्याने उजव्या इंजिनला आग लागली. यामुळे वैमानिकांनी तातडीने विमानाचे सुरक्षित लॅंडिग केले.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेननुसार, सकाळी 8 वाजता, बोईंग 767-3S2F विमानेच्या उजव्या इंडिनला आग लागली. त्यांनंतर विमान पुन्हा त्वरित धावपट्टीकडे वळवण्यात आले. नेवार्क विमानतळावर लॅंड होताच अग्निशमन दलाने तातडीने आग विझवली.
8am today FedEx plane leaving Newark airport has a bird strike.. right engine on fire emergency landing everyone is safe pic.twitter.com/bVwi60769F
— Jimmy Carter (@askjimmycarter) March 1, 2025
घटनेची चौकशी सुरु
राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने या घटनेची चौकशी सुरु केली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. सुदैवाने, फेडेक्स विमानातील सर्व कर्मचारी आणि मालवाहतूक सुरक्षित राहिली. काही काळासाठी सुरक्षेच्या कारणास्तव हवाई वाहतूक थांबवण्यात आली, मात्र काही वेळानंतर सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले.
पक्षी धडकल्याने इंजिनला आग
फेडेक्यच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइटने नेवार्कहून इंडियानापोलिसला जाण्यासाठी टेकऑफ केले. टेकऑफ दरम्यान दरम्यानच पक्ष्याची धडक बसली. यामुळे उजव्या इंजिनने पेट घेतला. परिस्थितीचे गांभींर्य लक्षात घेत वैमानिकांनी तातडीने विमान नेवार्ककडे परत वळवले आणि सुरक्षित लॅंडिग केले.
अमेरिकेतील विमान अपघातांच्या घटना
गेल्या कही दिवसांत अमेरिकेत अशा विमान अपघाताच्या अनेक घटने घडल्या आहेत. 25 फेब्रुवारीला शिकागो मिडवे विमानतळावर साउथवेस्ट एअरलाइन्सचे विमान थोडक्यात बचावले. यापूर्वी डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाच्या केबिनमध्ये धूर भरल्याने त्यांना अटलांटाला परतावे लागले होते. अमेरिकेतील अरिझोना येथे स्कॉट्सडेल विमानतळावरही दोन खासगी जेट विमानांची धडक झाली होती. फेब्रुवारीच्या सुरुवातील हेलिकॉप्टर आणि बिझनेस विमान अपघातात 67 लोकांचा मृत्यू झाला होता. ही घटना पुन्हा एकदा हवाई वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करते.