
Fentanyl 2mg tablet is more dangerous than a bomb took lives of 100,000 people in America every year
Fentanyl Weapon of Mass Destruction Trump : अमेरिकेवर (America) सध्या एका अशा संकटाने हल्ला केला आहे, जो कोणत्याही क्षेपणास्त्रापेक्षा किंवा बॉम्बपेक्षा जास्त धोकादायक आहे. हे संकट आहे ‘फेंटानिल’ (Fentanyl) या एका छोट्याशा गोळीचे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच या विषयावर अत्यंत कठोर भूमिका घेत, फेंटानिलला अधिकृतपणे ‘सामूहिक विनाशाचे शस्त्र’ (Weapon of Mass Destruction) घोषित करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ट्रम्प यांच्या मते, शत्रू देश या ड्रग्सचा वापर करून अमेरिकेची तरुण पिढी उद्ध्वस्त करत आहेत.
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, फेंटानिल हे केवळ अमली पदार्थ राहिलेले नाही, तर ते आता एक रासायनिक शस्त्र बनले आहे. ट्रम्प म्हणाले की, “बॉम्ब कधीतरी लोकांचा जीव घेतात, परंतु फेंटानिल दररोज, दर तासाला अमेरिकन लोकांचा बळी घेत आहे.” ही परिस्थिती इतकी भयानक आहे की, अमेरिकेत दरवर्षी होणाऱ्या मृत्यूंची संख्या लाखांच्या घरात पोहोचली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Jordan At 75: PM Modi यांचा जॉर्डन दौरा आहे एक बुद्धिबळाची चाल; इतर कोणत्याही अरब देशाकडे नाहीये ‘अशी’ अद्वितीय ढाल
फेंटानिल हे एक कृत्रिम ओपिओइड (Synthetic Opioid) आहे. वैद्यकीय भाषेत सांगायचे तर, हे औषध तीव्र वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते, परंतु त्याचा गैरवापर हा थेट मृत्यूला निमंत्रण देणारा ठरतो. त्याची तीव्रता इतकी भयानक आहे की, फक्त २ मिलीग्राम फेंटानिल एखाद्या निरोगी माणसाचा जीव घेऊ शकते.
BREAKING: President Trump just declared FENTANYL a WEAPON OF MASS DESTRUCTION. This critical step unleashes every tool to combat the cartels & foreign networks responsible for flooding communities with this deadly substance—the leading cause of death among Americans aged 18-45. pic.twitter.com/C9YXC53kzK — The White House (@WhiteHouse) December 15, 2025
credit : social media and Twitter
हे औषध मॉर्फिनपेक्षा ५० पट आणि हेरॉइनपेक्षा १०० पट अधिक शक्तिशाली आहे. सर्वात भीतीदायक बाब म्हणजे, ड्रग कार्टेल्स हे फेंटानिल इतर सामान्य औषधांमध्ये किंवा बनावट गोळ्यांमध्ये मिसळून विकतात, ज्यामुळे घेणाऱ्याला आपल्याला विष मिळत आहे याची जाणीवही होत नाही. २०२४ मध्ये अमेरिकन ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशन (DEA) ने तब्बल ३८० दशलक्ष घातक डोस जप्त केले- हे डोस संपूर्ण अमेरिकेचा एकाच वेळी नायनाट करण्यासाठी पुरेसे आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bondi Beach Shooting: बोंडी दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे थेट भारतापर्यंत; ‘अशा’ कुटील कारवाईमुळे सुरक्षा यंत्रणांच्या झोपा उडाल्या
अमेरिकेतील ‘नॅशनल सर्व्हे ऑन ड्रग युज अँड हेल्थ’ च्या २०२४ च्या अहवालानुसार, १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे १.४ दशलक्ष लोकांनी मान्य केले आहे की त्यांनी फेंटानिलचा वापर केला आहे. यातील ८ लाखांहून अधिक लोक याच्या पूर्णपणे आहारी गेले आहेत. मृत्यूची आकडेवारी पाहिली तर काळजाचा ठोका चुकतो. २०२२ मध्ये ७०,०००, २०२३ मध्ये ८१,००० आणि २०२४ मध्ये या संख्यने १,००,००० चा आकडा पार केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी चीन, मेक्सिको आणि व्हेनेझुएला या देशांना जबाबदार धरले आहे. त्यांच्या मते, हे देश सीमेवरून अवैध मार्गाने फेंटानिल अमेरिकेत पाठवून देशाची सामाजिक आणि आर्थिक घडी विस्कळीत करत आहेत. या संकटामुळे अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला असून, आता लष्करी स्तरावर याविरोधात पावले उचलली जात आहेत.
Ans: हे एक कृत्रिम ओपिओइड आहे जे मॉर्फिनपेक्षा ५० पट अधिक शक्तिशाली असून तीव्र वेदनाशामक म्हणून वापरले जाते, पण गैरवापर झाल्यास ते प्राणघातक ठरते.
Ans: फक्त २ मिलीग्राम फेंटानिल मानवी शरीरासाठी जीवघेणे ठरू शकते.
Ans: कारण या ड्रग्समुळे अमेरिकेत दरवर्षी १ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे, जो कोणत्याही युद्धातील जीवितहानीपेक्षा जास्त आहे.