आंदोलनकर्त्यांची अर्थमंत्र्यांना लाथाबुक्क्यांची मारहाण, धक्कादायक Video Viral
नेपाळमध्ये सोमवारी सोशल मीडिया साइट्सवरील सरकारने घातलेल्या बंदीविरोधात तरुणांनी केलेल्या हिंसक निदर्शनांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. याचदरम्यान मंत्र्यांवर सतत हल्ले होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आता आंदोलनकर्त्यांनी नेपाळचे अर्थमंत्री बिष्णू प्रसाद पौडेल यांना काठमांडूत रस्त्यावर पळवून पळवून मारलं आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला असून दरम्यान, केपी शर्मा ओली यांनीही पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. भ्रष्टाचारासह अनेक मुद्द्यांवरून राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळचे अर्थमंत्री विष्णू प्रसाद पौडेल यांना जमावाने रस्त्यावर पाठलाग केल्यानंतर मारहाण करण्यात आली. व्हायरल व्हिडिओमध्ये पौडेल यांना जमावाने घेरल्याचे दिसत आहेय परंतु ते त्यादरम्यान पळून जातात. अचानक रस्त्यावर उपस्थित असलेला एक निदर्शक त्यांना लाथ मारतो आणि अर्थमंत्री तिथेच पडतात, असं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. यानंतर जमाव पुन्हा त्यांच्यावर हल्ला करतो आणि ते आपला जीव वाचवण्यासाठी पळून जातो. नवराष्ट्र डिजीटल या व्हिडिओची सत्यता पुष्टी करत नाही.
निदर्शकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्यासह अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या वैयक्तिक निवासस्थानांवर हल्ला केला आणि संसद इमारतीची तोडफोड केली. ओली यांच्या राजीनाम्याच्या काही तास आधी, निदर्शकांनी बालकोट येथील त्यांच्या वैयक्तिक निवासस्थानाला आग लावली आणि माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल, दळणवळण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग, माजी गृहमंत्री रमेश लेखक इत्यादींच्या निवासस्थानांवर हल्ला केला.
Finance minister of NEPAL got an unexpected kick from common people of Nepal. pic.twitter.com/NrcCf7Vxrl
— non aesthetic things (@PicturesFoIder) September 9, 2025
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, निदर्शकांनी काठमांडूमधील नायकप येथील माजी गृहमंत्री रमेश लेखक यांच्या निवासस्थानालाही आग लावली. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर एका दिवसात ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ललितपूर जिल्ह्यातील सुनाकोठी येथील दळणवळण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या निवासस्थानावरही निदर्शक तरुणांनी दगडफेक केली. गुरुंग यांनी सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते.
सुदान गुरुंग निषेधांमध्ये आघाडीवर आहे. एका अर्थाने, सुदान गुरुंग हा नेपाळमधील निषेधामागील चेहरा आहे. सुदान गुरुंग यांच्या संघटनेने कोविड-१९ साथीच्या काळात लोकांना खूप मदत केली. ५०० हून अधिक ऑक्सिजन सिलिंडर रुग्णालयांना वाटण्यात आले आणि तुर्की भूकंपातही मदत पाठवण्यात आली. सुदानने अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. नेपाळ सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब इ.) बंदी घातल्याविरुद्ध जनरल झेडच्या हिंसक निदर्शनांचे नेतृत्व सुदान गुरुंग यांनी केले. त्यांनी इंस्टाग्रामवर तरुणांना शांततापूर्ण निषेधाचे आवाहन केले आणि विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि पुस्तके घालून रस्त्यावर येण्याचे आवाहन केले.