फोटो - सोशल मीडिया
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये एक हिंदू महिला पोलीस फोर्समध्ये अधिकारी बनली आहे. त्या सिंधमधील पहिल्या हिंदू महिला अधिकारी ठरल्या आहेत. ही तेथील मोठी गोष्टी मानली जात असून या अधिकारी महिलांचे नाव मनीषा रोपेटा असे आहे. अधिकारी मनीषा रोपेटा यांनी खडतर प्रवास करत ही पोस्ट मिळवली आहे. पाकिस्तानी देशातून आणि त्यांच्या समाजातून मनीषा यांचे कौतुक सुरु आहे. मनीषा रोपेटा यांनी त्यांची कहानी सांगितली असून त्यांचा प्रवास सांगितला आहे. मनीषा रोपेटा हे सांगताना भावनाविवश झाल्या आहेत.
पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) मनीषा रोपेटा, या मूळचे जेकबाबाद येथील आहेत. त्यांनी 2021 मध्ये सिंध लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. तिने ही परिक्षा उत्तीर्ण केल्यानंतर समाजातील सर्वांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. त्या एका मध्यमवर्गीय हिंदू कुटुंबातून येतात, त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण करणे ही मोठी गोष्ट मानली जात आहे. पाकिस्तान पोलिसांमध्ये दोन प्रकारचे अधिकारी असतात. यामध्ये एक अधिकारी जे अनुभवाच्या जोरावर उच्च पदावर पोहोचतात आणि दुसरे सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस (CSS) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नियुक्त केले जातात. मनीषा रोपेटा यांनी परीक्षा पास करत हे पद मिळवले आहे.
अधिकारी माझा आदर अन् कौतुक करतात
त्या म्हणाल्या की, “पाकिस्तानी पोलिसांमध्ये सुशिक्षित महिला अधिकारी फार कमी आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण क्षेत्रात डीएसपी पदावर कार्यरत असलेल्या मनीषा रोपेटा यांनी सिंध प्रांतातील पोलीस दलाची प्रतिमा बदलण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी हे पद मिळवल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी लहानपणीच्या कटू अनुभव सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. अधिकारी मनीषा रोपेटा म्हणाल्या की, ‘मी 13 वर्षांची असताना जेकोबाबादमध्ये व्यापारी असलेले वडील गमावले. तेव्हापासून आमच्या एकुलत्या एक भावाने मला पोलीस दलात भरती होण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आणि पाठिंबा दिला. सहकारी आणि अधिकारी माझा आदर करतात आणि माझ्या कामाचे कौतुक करतात, “असे मनीषा रोपेटा यांनी सांगितले.
हिंदू मुलींनी प्रेरणा घ्यावी
पुढे त्या म्हणाल्या की, “महिला म्हणून काही समस्या असून शकतात. मात्र पोलीस दलामध्ये मला काहीही वेगळे वाटत नाही. आणि मी हिंदू स्त्री आहे याने काही फरक पडत नाही. आजही जेव्हा मी पोलिसांचा गणवेश घालते तेव्हा मला अभिमान वाटतो. आणि मला आशा आहे की आमच्या समाजातील मुली माझ्याकडून प्रेरणा घेतील. आणि माझ्यासारख्याच पोलीस क्षेत्रामध्ये येतील. मनीषा रोपेटा म्हणाल्या की, सिंधमधील सुशिक्षित हिंदू कुटुंबातील मुली सहसा वैद्यकीय किंवा अध्यापनाचा व्यवसाय स्वीकारत असल्याने पोलिस दलात सामील होणे हे एक मोठे पाऊल आहे,” असा भावना पोलीस अधिकारी मनीषा रोपेटा यांनी व्यक्त केल्या आहेत.






