(फोटो सौजन्य - अकाउंट)
९ महिने आणि १३ दिवसांनंतर, भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतली आहे. अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स हे स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानातून अंतराळातून परतले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) सोडल्यानंतर जवळजवळ १७ तासांनी, त्यांचे कॅप्सूल फ्लोरिडा पॅनहँडलच्या टालाहासी किनाऱ्याजवळ मेक्सिकोच्या आखातात उतरले. ड्रॅगन अंतराळयानाचे कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्रात उतरवण्यात आले, त्यानंतर सुनीता विल्यम्स कॅप्सूलमधून बाहेर पडली तेव्हा तिने हात हलवून सर्वांचे स्वागत केले.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या सुरक्षित परतीबद्दल अमेरिकेत आनंदाचे वातावरण आहे, तर या मोहिमेतील नासा आणि स्पेसएक्सच्या भूमिकेचेही कौतुक केले जात आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) नऊ महिने अडकून राहिल्यानंतर यशस्वीरित्या परतलेल्या अंतराळवीरांचे व्हाईट हाऊसने स्वागत केले. व्हाईट हाऊसने एक्सवर पोस्ट केले की, “आश्वासने दिली, आश्वासने पाळली: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना परत आणण्याचे वचन दिले आणि त्यांनी त्यांचे वचन पाळले.” असे म्हटले आहे.
सुनीता विल्यम्सच्या अडचणी काही थांबेना! लॅंडिंगवेळी पृथ्वीवर येताना अंतराळयानाचा होऊ शकतो स्फोट?
#WATCH | On astronaut Sunita William’s safe return to Earth, Former ISRO Chief Dr G Madhavan Nair says,” It is a proud moment for all of us in the Space community. It is a successful completion of a rescue operation that lasted nearly nine months.” pic.twitter.com/MxXJ3ibnIw
— ANI (@ANI) March 19, 2025
सुनीता विल्यम्सच्या ऐतिहासिक पुनरागमनाबद्दल भारतात जल्लोष
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सुनीता विल्यम्सचे पृथ्वीवर यशस्वी पुनरागमन भारत आणि संपूर्ण जगासाठी अभिमानाचा, गौरवाचा आणि दिलासाचा क्षण असल्याचे वर्णन केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, ‘अभिमान, गौरव आणि दिलासाचा क्षण!’ अवकाशातील अस्थिरतेत अदम्य धैर्य, दृढनिश्चय आणि चिकाटीने इतिहास रचणाऱ्या या महान भारतीय कन्येच्या सुरक्षित पुनरागमनाचा आनंद संपूर्ण जग साजरा करत आहे.’ असे त्यांनी म्हटले आहे.
इस्रोचे माजी प्रमुख माधवन यांनी केले कौतुक
अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या पृथ्वीवर सुरक्षित परतण्याबद्दल, माजी इस्रो प्रमुख डॉ. जी. माधवन नायर म्हणाले, “अंतराळ समुदायातील आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. जवळजवळ नऊ महिने चाललेल्या बचाव मोहिमेचा हा यशस्वी समारोप आहे.” असे ते म्हणाले आहेत.
आता पुनर्वसन ह्युस्टनमध्ये होईल
मेक्सिकोच्या आखातात उतरल्यानंतर, दोन्ही अंतराळवीर प्रथम स्पेसएक्सच्या रिकव्हरी जहाजावर राहतील आणि नंतर ह्युस्टनला पोहोचतील. तेथे, फ्लाइट सर्जन त्यांची वैद्यकीय तपासणी करतील आणि काही दिवस त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. या रोमांचक मोहिमेच्या समाप्तीसह, विल्मोर आणि विल्यम्स आता पृथ्वीवर परतले आहेत, परंतु त्यांचा ऐतिहासिक प्रवास दीर्घकाळ लक्षात राहील.