Tanushree Dutta Birthday She Was Representing India In Miss
बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत आहे. कधी मी-टू मोहिमेमुळे तर कधी कोर्ट केसमुळे बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताचे नाव पुढे आले. कायमच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या तनुश्री दत्ताचा आज ४१ वा वाढदिवस आहे. तनुश्री दत्ताने आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने स्वत:चे अभिनय कौशल्य सिद्ध केले. २००४ मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्वही केले होते. ‘आशिकी बनाया आपने’ गाण्याने प्रसिद्धीझोतात आलेली तनुश्री एकेकाळी लाखो दिलांची धडकन होती. आपल्या करियरमध्ये अनेक चढ- उतार पाहिलेल्या तनुश्रीच्या आज वाढदिवसानिमित्त तिच्याविषयी जाणून घेऊया…
समाजातील वास्तव रुपेरी पडद्यावर येणार, ‘नयन’ चित्रपटाचा पोस्टर रिलीज
१९ मार्च १९८४ रोजी झारखंडच्या जमशेदपुरमधील एका बंगाली कुटुंबात तनुश्रीचा जन्म झाला आहे. सुरुवातीचे शिक्षण जमशेदपूरमध्ये घेतल्यानंतर तनुश्री पुण्यामध्ये स्थायिक झाली. तिने पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. यानंतर तनुश्रीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये वळण्याचा निर्णय घेतला. याशिवाय तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी तनुश्री दत्ताने ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला. इतकंच नाही तर, तनुश्रीने मिस युनिव्हर्स स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, तनुश्रीला या स्पर्धेत फक्त टॉप १०मध्येच स्थान मिळवता आले. २००४ मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तनुश्री दत्ताने ‘आशिक बनाया आपने’ चित्रपटानंतर ‘चॉकलेट’मध्ये काम केले. हे दोन्ही चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाले होते.
“ते पेटवतील, आपण संयम ठेवायचा…” नागपूर हिंसाचारावर मराठमोळ्या अभिनेत्याची खरमरीत पोस्ट…
त्यानंतर तनुश्रीने ‘भागम भाग’, ‘ढोल’ आणि ‘गुड बॉय बॅड बॉय’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१० मध्ये रिलीज झालेला ‘अपार्टमेंट’ चित्रपट तनुश्रीचा शेवटचा चित्रपट होता. अनेक चित्रपटांमध्ये काम करूनही तनुश्रीला चित्रपटसृष्टीत हवे तसे स्थान मिळाले नाही. फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणावे तसे स्थान मिळत नसल्याने तिने फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला आणि अमेरिकेत शिफ्ट झाली. तनुश्री शेवटची ‘अपार्टमेंट’ चित्रपटात दिसली होती. अचानक फिल्म इंडस्ट्रीतून गायब झालेली तनुश्री त्यानंतर अचानक २०१२ मध्ये एका कार्यक्रमात दिसली होती. त्यावेळी तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. बॉब कट हेअरस्टाईल आणि साडीत तनुश्रीला ओळखणे अवघड झाले होते. यानंतर तनुश्री पुन्हा बराच काळ मीडियापासून दूर राहिली.
एका झटक्यात सगळं काही मिळवणारी तनुश्री तिच्या ढासळत्या करियरला सांभाळू शकली नव्हती. तिच्या चित्रपटांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे हळूहळू ती नैराश्यात गेली होती. यातून सुटका मिळवण्यासाठी तिने ग्लॅमर जगाला निरोप दिला आणि अध्यात्माचा मार्ग निवडला. ती एका आश्रमात राहायलाही गेली होती. मात्र, तनुश्रीने अचानक बॉलिवूडला का निरोप दिला, असा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात घर करुन आहे. २०१८ मध्ये, तनुश्रीने अभिनेते नाना पाटेकरांवर ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर आपल्याला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केला. तनुश्रीने भारतात MeToo मोहीम सुरू केली तेव्हा ती अचानक प्रकाशझोतात आली. तनुश्रीचा हा ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपट २००८ मध्ये रिलीज झाला होता.