Former KGB officer said Putin has videos and documents that can destroy Trump
Putin kompromat on Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची आज (१५ ऑगस्ट) अलास्कामध्ये होणारी महत्वाची बैठक सुरू होण्याआधीच एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. कझाकस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे (केएनबी) माजी प्रमुख आणि माजी केजीबी अधिकारी मेजर जनरल एलनूर मुसायेव यांनी दावा केला आहे की, पुतिनकडे ट्रम्पविरोधात असे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि कागदपत्रे आहेत जी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट करू शकतात.
मुसायेव यांच्या मते, रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (FSB) कडे असलेल्या या कागदपत्रांत आणि व्हिडिओंमध्ये ट्रम्प यांच्यावर अल्पवयीन मुलांविरुद्ध लैंगिक गुन्हे, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, तसेच जेफ्री एपस्टाईनच्या सेक्स रॅकेटशी संबंधित पुरावे सामावले आहेत. त्यांचा दावा आहे की, या पुराव्यांचा वापर पुतिन आणि क्रेमलिन ट्रम्पवर राजकीय दबाव आणण्यासाठी करू शकतात, ज्यामुळे ट्रम्प रशियाच्या हितसंबंधांना पाठिंबा देतील आणि कदाचित नाटो व युरोपियन युनियन कमकुवत करण्याचे काम करतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : गाझा ते सुदान… युद्धात महिलांचा शारीरिक छळ मोठ्या प्रमाणावर; संयुक्त राष्ट्रांनी सादर केला थरारक अहवाल
मुसायेव यांनी सांगितले की, १९९० च्या दशकात कझाकस्तानमधील काही व्यावसायिकांनी एपस्टाईनच्या खाजगी बेटावर आणि ट्रम्पच्या फ्लोरिडातील मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये मुली पुरवल्या होत्या. या प्रकरणातील मुख्य आरोपी तोफिक आरिफोव याच्यावर फौजदारी खटला चालू असताना एफएसबीच्या हस्तक्षेपामुळे तो मागे घेण्यात आला. त्याचबरोबर, इतर तीन श्रीमंत कझाक नागरिकांवरही रशियाच्या सूचनेनुसार मदत केल्याचा आरोप आहे.
मुसायेव यांच्या दाव्यानुसार, २०१३ मध्ये ट्रम्प यांनी मॉस्कोमध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित केली होती. अब्जाधीश अरास अगालारोव्ह यांनी यासाठी निधी दिला होता आणि हा कार्यक्रम त्यांच्या मालकीच्या क्रोकस सिटी कॉम्प्लेक्समध्ये झाला होता. ट्रम्प यांनी या ठिकाणाला रशियातील ‘सर्वात महत्त्वाचे स्थान’ म्हटले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : गाझा ते सुदान… युद्धात महिलांचा शारीरिक छळ मोठ्या प्रमाणावर; संयुक्त राष्ट्रांनी सादर केला थरारक अहवाल
२०१९ नंतर प्रथमच पुतिन आणि ट्रम्प यांची ही प्रत्यक्ष भेट होणार आहे. अलास्काच्या अँकोरेज शहरात होणाऱ्या या चर्चेत युक्रेन युद्ध संपवण्यावर भर दिला जाणार आहे. यापूर्वी ट्रम्पच्या मध्यस्थीखाली रशिया आणि युक्रेनमध्ये झालेल्या तीन चर्चाही निष्फळ ठरल्या होत्या. या खुलाशांमुळे पुतिन-ट्रम्प बैठकीवर अनिश्चिततेचे सावट गडद झाले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील ही घडामोड अमेरिकन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि युक्रेन-रशिया युद्धाच्या संदर्भात प्रचंड महत्त्वाची मानली जात आहे. मुसायेव यांच्या विधानांवर ट्रम्प आणि पुतिन यांच्याकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र जागतिक राजकीय वर्तुळात यामुळे खळबळ माजली आहे.