Former Nepal PM Khanal's wife dies after set on fire by protester
Nepal Protest : काठमांडू : नेपाळमध्ये हिंसक आंदोलन थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. देशाच्या अनेक अधिकारी आणि नेत्यांवर हल्ले केले जात आहे. दरम्यान नेपाळचे माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्या घरात घुसून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली होती. तसेच अर्थमंत्री विष्णू पोडोल यांनाही मारहाण करण्यात आली आहे. याच वेळी आणकी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नेपाळचे माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकार यांची हत्या झाली वृत्त मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आंदोलन कर्त्यांनी त्यांच्या घराला आग लावली होती. या आगीत झलनाथ खनाल यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. निदर्शकांनी त्यांना घरात कोडूंन ठेवले होते, यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही.
त्यांना गंभीर अवस्थेत कीर्तिपूर बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या देशभारतील परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. निदर्शने अधिक हिंसक होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
कोण आहेत झलनाथ खनल?
झलनाथ खनल हे नेपाळचे ३५वे पंतप्रधान होते. त्यांनी २०११ मध्ये नेपाळच्या सत्तेचे सूत्र हाती घेतले होते. ते नेपाळच्या वरिष्ठ कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. पंतप्रधान ओली शर्मा यांच्याशी झालेल्या वादादरम्यान ते नेपाळच्या CPN पक्षातून बाहेर पडले होते. त्यांनी १९९७ मध्ये नेपाळच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे कामकाजही पाहिले आहे.
पंतप्रधान ओली शर्मा यांच्या राजीनाम्यानंतरही अस्थिरता
नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी मंगळवारी (०९ सप्टेंबर) रोजी देशातील बिघडती परिस्थिती पाहता राजीनाम्याची घोषणा केली होती. परंतु त्यांच्या राजीनाम्यानंतरही परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. अनेक अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना मारहाण केली जात आहे. निदर्शने अधिक हिंसक होण्याची भीती देखील निर्माण झाली आहे.
भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सुचना जारी
नेपाळमधील हिंसक निदर्शनांदम्यान १५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ३०० हून अधिक लोक जखमी झाले आहे. याच पार्श्वभूमीव भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी प्रवास सल्लागार जारी केला आहेत. तसेच नेपाळमधील भारतीय नागरिकांसाठी सुचनाही जारी केल्या आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) म्हटले आहे की, भारतीय नागरिकांनी परिस्थिती सामान्य होईपर्यंत नेपाळचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच नेपाळमध्ये असलेल्या भारतीयांना घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच नेपाळच्या अधिकाऱ्यांच्या सूचना आणि नियमांचे पालन करण्यासही सांगण्यात आले आहे.
Nepal Gen Z Protest: आंदोलनकर्त्यांची अर्थमंत्र्यांना लाथाबुक्क्यांची मारहाण, धक्कादायक Video Viral