
26/11 Mumbai Attack: मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला होता. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय (ISI)ने मुंबईवर हा हल्ला केला होता. या हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. मुंबईवर झालेल्या या हल्ल्यात महाराष्ट्राने मोठे पोलिस अधिकारी गमावले. मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाबला फाशीची शिक्षा देण्यात आली तर त्याच्या इतर साथीदारांना जागीच यमसदनी धाडण्यात आले. या हल्ल्याला आज १८ वर्षे उलटून गेल्यानंतर पाकिस्तानी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचे माजी सल्लागार आणि सध्याचे प्रवक्ते फरहतुल्ला बाबर यांनी २००८ च्या मुंबई हल्ल्यांबाबत (२६/११) धाडसी दावा केला आहे.
फरहतुल्ला बाबर यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात २६/११ च्या हल्ल्याबाबत काही गंभीर दावे केले आहेत. झरदारी यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या ऑफर दिली होती. त्यांच्या या ऑफरमुळे आयएसआय संतप्त झाली आणि काही दिवसांतच मुंबईवर हल्ले करण्यात आले.
Maharashtra Politics: पवारांनी फिरवली भाकरी! “फक्त भाजपसोबत…”; राष्ट्रवादी, शिवसेनेसोबत युती करणार?
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने बाबर यांच्या “द झरदारी प्रेसिडेन्सी: नाऊ इट मस्ट बी टोल्ड” या पुस्तकाचा हवाला दिला आहे. काही वर्षापूर्वी झरदारी यांनी दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत भारतीय पत्रकार करण थापर यांना मुलाखत दिली होती. या मुलाखतीत झरदारी यांनी भारताला अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या ऑफरमुळे “पाकिस्तानी युद्धप्रेमी” कसे संतापले होते, याबाबत माहिती दिली होती.
पाकिस्तानी लेखक बाबर यांनी आपल्या पुस्तकात माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्याविषयी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, झरदारी यांनी भारताच्या “एकतर्फी घोषित अण्वस्त्र न वापरण्याच्या धोरणा”चा हवाला देत पाकिस्ताननेही प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नाही, असे विधान केले होते. बाबर यांच्या मते, या वक्तव्यामुळे पाकिस्तानी सैन्यात तीव्र घबराट निर्माण झाली होती. त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे, “या मुलाखतीनंतर अवघ्या चार दिवसांत २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवाद्यांनी भीषण हल्ले केले, ज्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला.”
हा हल्ला पाकिस्तानी सैन्यातील शक्तिशाली दहशतवादी आयएसआय (आंतरराष्ट्रीय सुरक्षा गुप्तचर) कडून भारतासोबतच्या कोणत्याही संभाव्य शांतता प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी थेट प्रत्युत्तर होता. यामुळे येत्या काळात दोन्ही देश युद्धाच्या जवळ आले आणि शांततेच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या.” असाही दावा बाबत यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.
बाबर यांनी केलेल्या दाव्यांमध्ये आणि उपलब्ध तथ्यांमध्ये कोणतीही सुसंगती आढळत नाही. त्यांच्या मते, झरदारी यांनी २२ नोव्हेंबर २००८ रोजी भारताशी शांततेचा प्रस्ताव दिला होता. मात्र, नोंदींनुसार लष्कर-ए-तोयबाचे १० दहशतवादी २१ नोव्हेंबरलाच कराचीहून समुद्री मार्गाने मुंबईकडे रवाना झाले होते. हे दहशतवादी आयएसआयच्या प्रशिक्षणाखाली होते आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज होते. त्यामुळे झरदारींच्या शांततेच्या प्रस्तावानंतर अवघ्या काही दिवसांतच मुंबईत झालेल्या हल्ल्यांमागे वेगळेच सूत्र असल्याचे स्पष्ट होते.
बाबर त्यांच्या पुस्तकात लिहितात की, लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांना पदावरून हटवल्यानंतर आसिफ अली झरदारी यांचे राष्ट्रपतीपदावर आगमन हे लष्करी नेतृत्वासाठी अनपेक्षित ठरले. २००६ च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट आणि २६/११ हल्ल्यांच्या नियोजनादरम्यान तत्कालीन लष्करप्रमुख जनरल अशफाक परवेझ कयानी यांच्याकडे लष्कराचे नेतृत्व होते. बाबर यांच्या मते, कयानी यांना झरदारी राष्ट्रपती म्हणून नको होते, आणि यामुळे पाकिस्तानी लष्कराची “गुप्तचर देखरेख आणि सत्ता नियंत्रक” अशी दुहेरी भूमिका अधोरेखित होते.
पुस्तकात पुढे नमूद केले आहे की, २०११ मध्ये ओसामा बिन लादेनच्या हत्येनंतर झरदारी यांनी दोनदा गुप्तचर संस्थांना नागरी नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले, ज्यातून लष्कराचे कायमस्वरूपी वर्चस्व स्पष्ट होते. “पाकिस्तानात इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे,” असा इशारा बाबर शेवटी देतात.