जोहरान ममदानी यांच्या विजयाने अमेरिकेच्या राजकारणात उलथापालथ होणार
अमेरिकेतील सर्वात मोठे शहर असलेल्या न्यू यॉर्कमध्ये भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांची महापौर पदावर बहुमताने निवडून आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक असलेले जोहरान ममदानी यांच्या विजयामुळे न्यू यॉर्क शहर एक प्रमुख राजकीय आखाडा बनले आहे. ममदानी यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कर्टिस स्लिवा यांना प्रचंड मतांनी पराभव केला.
पण ममदानी महापौर पदावर निवडून आल्यास आपण न्यु यॉर्कचा निधी थांबवू अशी धमकीही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. पण ममदानी यांच्या विजयामुळे शहरात नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. ममदानी यांची विजयामुळे न्युयॉर्क शहराला चार नव्या निर्माण झाल्या आहेत.
जोहरान ममदानी यांचा विजय हा संघराज्यवादाची थेट परीक्षा असल्याचे मानले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जोहरान ममदानी यांच्यात तीव्र राजकीय मतभेद आहेत. ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वीच जोहरान ममदानी जिंकले तर न्युयॉर्कचा निधी रोखण्याची धमकी दिली आहे. ममदानीच्या विजयामुळे न्यू यॉर्क शहर आर्थिक स्थिरतेच्या बाबतीत कठीण स्थितीत आहे. न्यू यॉर्क शहर आता स्थानिक स्वायत्तता आणि संघराज्य सत्तेतील संघर्षाचे तात्काळ रणांगण बनले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या “अमेरिका फर्स्ट” आणि “मेक अमेरिका ग्रेट अगेन” (MAGA) या विचारसरणीसाठी हा पराभव एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही. मोठ्या शहरांतील मतदार आता केवळ सांस्कृतिक तक्रारींमध्ये अडकणार नसल्याचे ममदानी यांच्या विजयाने दाखवून दिले आहे. या मतदारांना ठोस आणि प्रत्यक्ष उपाय हवे आहेत. परवडणारी घरे, स्थिर नोकऱ्या आणि सर्वांसाठी समान संधी हव्या आहे. त्यामुळे ट्रम्प-शैलीचे भावनिक आणि विभागणीवर आधारित राजकारण आता सर्वत्र प्रभावी राहिले नसल्याचे दिसत आहे.
ममदानी उघडपणे पॅलेस्टाईनला समर्थन देतात आणि इस्रायल (इजिऑनिझम विरोधी) बद्दल ठाम विचार ठेवतात. यामुळे न्यू यॉर्कच्या शक्तिशाली ज्यू समुदायात अस्वस्थता निर्माण झाली आहे. “हिंदूफोबिया” च्या आरोपांमुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. त्यांच्या जागतिक दृष्टिकोनामुळे शहरातील विविध समुदायांमध्ये खोल धार्मिक आणि वैचारिक तणाव निर्माण होऊ शकतो. शहराला एकजूट ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे.
जोहरान ममदानी यांचे मुख्य घोषवाक्य “टॅक्स द रिच” आहे. यामुळे उच्च उत्पन्न असलेल्या न्यू यॉर्कमधील लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होण्याची भीती निर्माण झाली आहे. जर श्रीमंत लोक निघून गेले तर शहराच्या कर संकलनात घट होईल. ममदानी यांनी वचन दिलेल्या सुधारणा निधीशिवाय राहतील, ज्यामुळे शहराचे बजेट बिघडू शकते.






