महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट (फोटो- सोशल मीडिया)
राज्यात जाहीर झाल्या निवडणुका
महायुती व महाविकास आघाडीत होणार लढत
अनेक पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत
NCP Sharad Pawar: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. काल राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. नगर पंचायत आणि नगर परिषदेची निवडणूक जाहीर होताच सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान निवडणूक जाहीर होताच राज्याच्या राजकारणात एक नवीनच खेळी समोर आली आहे.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने याची घोषणा केली आहे. दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भाकरी फिरवल्याचे दिसून येत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केल्याचे समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप सोडून सर्व पक्षांशी युती करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे समोर येत आहे. याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. म्हणजेच शरद पवार भाजप सोडून अन्य पक्षांशी युती करणार का हे पहावे लागणार आहे.
प्रत्येक भागतील स्थानिक परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट समोर आला आहे. भाजप सोडून सर्व पक्षांशी युती करण्याचा निर्णय शरद पवार यांच्या पक्षाने घेतल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शरद पवार हे भाजप सोडून म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी देखील युती करणार का हे पहावे लागणार आहे.






