इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Prime Minister of Pakistan Imran Khan) यांना येत्या २४ तासांत अटक होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी मीडियाने सूत्रांकडुम समोर आलेल्या माहितीनुसार हा दावा करण्यात येत आहे. इम्रान खानला यांना अटक करण्यासाठी इस्लामाबादमधुन पोलिसांच एक पथक हेलिकॉप्टरने लाहोरला पोहोचणार आहे.
[read_also content=”चीनच्या ‘या’ शहरात पुन्हा लॉकडाऊनची तयारी, कोरोना नाही आता ‘या’ आजारानं केलंय हैरान! https://www.navarashtra.com/world/chinese-city-proposes-lockdowns-for-flu-and-faces-a-backlash-nrps-375930.html”]
नेमकं प्रकरण काय?
तोशाखाना प्रकरणात कोर्टात हजर न राहिल्याने आणि गेल्या वर्षी एका जाहीर सभेला संबोधित करताना एका महिला न्यायाधीशाला धमकावल्याबद्दल खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. खान विरुद्ध दोन अजामीनपात्र अटक वॉरंट जारी झाल्यानंतर, इस्लामाबाद पोलीस पीटीआय प्रमुखाला अटक करण्यासाठी एका विशेष हेलिकॉप्टरने लाहोरला आले, त्यानंतर त्यांनी त्यांच्या जमान पार्क निवासस्थानापासून मोर्चाचे नेतृत्व केले, द एक्सप्रेस ट्रिब्यूनने वृत्त दिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामाबाद आणि लाहोर पोलिसांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. इम्रान यांना अटक करण्यासाठी पोलिस पूर्ण सहकार्य करतील आणि पोलिसांचे पथक इम्रान खानच्या जमान पार्कमध्ये कोणत्याही अडचणी शिवाय पोहोचेल याची काळजी घेतली जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. इम्रान खान यांना अटक करण्यापूर्वी पोलीस त्याच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याशी संपर्क साधतील.
एफआयआरमध्ये इम्रानने सरकारी अधिकाऱ्यांना त्याच्याविरुद्ध चौकशी करण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी दंडाधिकारी अली जावेद यांनी गुन्हा दाखल केला होता. इम्रान खानवरही दहशतवादाची कलमे लावण्यात आली होती. मात्र नंतर तो काढण्यात आला. दोन न्यायालयांनी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहेत. याशिवाय तोशाखाना प्रकरणाशी संबंधित प्रकरणातही त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले आहे. याप्रकरणी त्याला अटक करण्यासाठी पोलीस ५ मार्चला पोहोचले होते.