France launches Poker 2025 nuclear drill with Rafale and Mirage jets to counter Russian threats
पॅरिस : जागतिक सुरक्षा परिस्थितीत प्रचंड उलथापालथ होत असताना, फ्रान्सने आपल्या आण्विक प्रतिबंधक दलाचा सराव ‘पोकर 2025’ सुरू केला आहे. या सरावात राफेल बी आणि मिराज 2000 लढाऊ विमाने सहभागी होत असून, ASMP-A क्षेपणास्त्रांद्वारे आण्विक हल्ल्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. फ्रान्सकडील 290 अणुबॉम्बपैकी 280 तैनात असून, रशियाच्या वाढत्या धोक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी फ्रान्सने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर, फ्रान्सने मंगळवारपासून हा विशेष आण्विक सराव सुरू केला आहे, जो वर्षातून चार वेळा आयोजित केला जातो. मात्र, यावेळी हा सराव विशेष असून तो रात्रीसह दिवसाही केला जात आहे.
या सरावात 20 हून अधिक फायटर जेट्स सहभागी होत असून, दोन संघात विभागणी करण्यात आली आहे:
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हवाईमध्ये किलौआ ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक; पाहा ‘हा’ अंगावर शहरे आणणारा चित्तथरारक VIDEO
फ्रान्सकडे सध्या तीन प्रमुख आण्विक एअरबेस आहेत – सेंट-डिझियर, इस्टेरे आणि एव्हॉर्ड. या हवाई तळांवरून राफेल आणि मिराज विमाने उड्डाण करत शत्रूच्या दिशेने झेपावण्याचा सराव करतात. या सरावादरम्यान, ब्लू टीम स्कॅल्प क्रूझ क्षेपणास्त्राच्या मदतीने शत्रूच्या कमांड पोस्टवर हल्ल्याचा सराव करते, तर रेड टीम राफेल फायटर विमाने आणि शक्तिशाली हवाई संरक्षण प्रणाली वापरून त्याला प्रत्युत्तर देते. फ्रान्सने SAMP/T हवाई संरक्षण यंत्रणा आणि अत्याधुनिक जॅमिंग तंत्रज्ञान तैनात करून या सरावाला आणखी वास्तववादी बनवले आहे.
🔴 In France, nuclear forces exercises named Poker 2025 have begun.
↘️The exercise scenario is as follows: the country is divided into two parts—hostile and allied. The hostile side attempts to breach missile defense systems, organize appropriate air routes, and carry out… pic.twitter.com/uqrkba2erT
— Visioner (@visionergeo) March 26, 2025
credit : social media
फ्रान्सकडील ASMP-A सुपरसॉनिक क्षेपणास्त्र 600 किमीच्या मर्यादेत आण्विक हल्ला करू शकते. या सरावात 500 किमी दूर असलेल्या लक्ष्यावर हल्ला करण्याचा सराव केला जात आहे. फ्रान्स वर्षातून एकदा या क्षेपणास्त्राच्या क्षमता तपासण्यासाठी त्याचा सराव करत असतो. ब्रिटनच्या विपरीत, फ्रान्स स्वतःच्या अणुबॉम्ब निर्मितीत स्वतंत्र आहे आणि त्याला अमेरिकेवर अवलंबून राहावे लागत नाही.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युरोपला अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आण्विक सुरक्षा कवच देण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी नाटोला पाठिंबा कमी करण्याचे संकेत दिल्यानंतर, युरोपमध्ये रशियाच्या आण्विक हल्ल्याची भीती वाढली आहे. रशियन अधिकाऱ्यांनी युरोपला थेट अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे, त्यामुळे फ्रान्सच्या या सरावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : दुबईच्या राजघराण्यात जन्मलेल्या नवजात राजकुमारीचे नाव ‘हिंद’ का ठेवले? वाचा यामागचे रंजक कारण
‘पोकर 2025’ हा सराव केवळ फ्रान्ससाठी नव्हे, तर संपूर्ण युरोपच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा आहे. फ्रान्स आता अमेरिकेच्या मदतीशिवाय युरोपला संरक्षण देऊ शकतो, हे या सरावातून स्पष्ट झाले आहे. फ्रान्सच्या राफेल आणि मिराज विमानांसह अण्वस्त्र सरावाच्या निर्णयामुळे रशियाला थेट इशारा मिळाला आहे, तर ट्रम्प यांच्या धोरणांना प्रत्युत्तर देण्याची तयारीही सुरू झाली आहे. यामुळे आगामी काळात युरोपियन सुरक्षा धोरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.