दुबईच्या राजघराण्यात जन्मलेल्या नवजात राजकुमारी नाव ‘हिंद’ ठेवले? वाचा यामागचे रंजक कारण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
दुबई : दुबईच्या राजघराण्यात आनंदाचे वातावरण आहे. दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम चौथ्यांदा वडील झाले असून, त्यांच्या पत्नीने एका गोंडस कन्येला जन्म दिला आहे. नवजात मुलीचे नाव ‘हिंद’ ठेवण्यात आले असून, हे नाव शेख हमदान यांच्या आई, हिंद बिंत मकतूम बिन जुमा यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे. शेख हमदान यांनी आपल्या नवजात कन्येच्या आगमनाची बातमी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या कन्येसाठी प्रार्थना केली आणि आनंद व्यक्त केला.
दुबईच्या राजघराण्यात नवीन पिढीच्या नावांची निवड ही पारंपरिक असते. राजघराण्यात पूर्वीच्या पिढ्यांचे नाव नव्या पिढीला देण्याची प्रथा आहे, आणि शेख हमदान यांनीही तीच परंपरा पाळली आहे. त्यांच्या नवजात कन्येचे नाव त्यांच्या आईच्या सन्मानार्थ हिंद ठेवण्यात आले आहे. शेख हमदान आणि त्यांच्या पत्नीला याआधी दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. 2021 मध्ये या जोडप्याने जुळ्या मुलांना, शेखा आणि रशीद, जन्म दिला, तर 2023 मध्ये त्यांना तिसरा मुलगा झाला, ज्याचे नाव मोहम्मद बिन ठेवण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हवाईमध्ये किलौआ ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक; पाहा ‘हा’ अंगावर शहरे आणणारा चित्तथरारक VIDEO
शेख हमदान यांचा विवाह 6 वर्षांपूर्वी त्याच्याच चुलत बहिणीशी झाला होता. त्यांच्या पत्नीचे नाव शेखा शेख आहे. राजघराण्यातील असल्यामुळे शेखा शेख यांचे खासगी जीवन अत्यंत गोपनीय ठेवले जाते. केवळ निवडक प्रसंगीच त्या सार्वजनिक नजरेत येतात. अवघ्या 6 वर्षांत या जोडप्याला चार मुलांचे पालक होण्याचा सौभाग्य लाभले असून, दुबईच्या राजघराण्यातील ही एक महत्त्वाची घटना मानली जात आहे.
४२ वर्षीय शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम हे दुबईचे प्रमुख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचे दुसरे पुत्र आहेत. त्यांच्याकडे केवळ क्राउन प्रिन्सपदच नाही, तर ते दुबईचे उपपंतप्रधानही आहेत. शेख हमदान यांना ‘फजा’ या टोपणनावानेही ओळखले जाते. ते इंस्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असून, त्यांच्या साहसी प्रवास, शाही जीवनशैली, खेळ आणि कुटुंबाबद्दलच्या पोस्टमुळे ते कायम चर्चेत असतात.
अलीकडेच शेख हमदान यांनी आपल्या एका पोस्टमध्ये ब्रिटनमध्ये अधिक वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त केली. दरवर्षी ते उन्हाळ्यात आपल्या कुटुंबासोबत ब्रिटनला जातात. ही बाब अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली असून, शेख हमदान येत्या काळात दुबईच्या शाही जबाबदाऱ्या कमी करून अधिक वेळ ब्रिटनमध्ये घालवतील का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शेख हमदान यांच्या कुटुंबात नव्या सदस्याचे स्वागत होत असताना संपूर्ण दुबईत आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या चाहत्यांनी आणि राजघराण्याशी संबंधित नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शेख हमदान यांच्या कन्येचे नाव हिंद ठेवण्यामागील भावनिक आणि पारंपरिक महत्त्व लक्षात घेतल्यास, हा निर्णय त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. राजघराण्याच्या परंपरांनुसार पुढील पिढ्यांना पूर्वजांचे नाव देण्याची प्रथा पाळली जात आहे, आणि शेख हमदान यांनीही त्यांच्या आईच्या सन्मानार्थ हीच परंपरा जपली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘माझे पीरियड्स नसते तर काय झालं असतं… ?’ हमासच्या कैदेतून सुटलेल्या इलानाची थरारक कहाणी
दुबईच्या क्राउन प्रिन्स शेख हमदान यांचा कुटुंब वाढला असून, त्यांच्या चौथ्या अपत्याच्या आगमनाने दुबईच्या राजघराण्यात उत्साहाचे वातावरण आहे. नवजात कन्या हिंद हिचे नाव त्यांच्या आजीच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे, जे दुबईच्या शाही परंपरेचे प्रतीक आहे. शेख हमदान यांचे जीवन आणि त्यांचे निर्णय सातत्याने चर्चेत असतात. भविष्यात त्यांच्या ब्रिटनप्रवासाच्या निर्णयावर आणि राजघराण्यातील पुढील पिढ्यांच्या भूमिकांवर लक्ष राहील.