France PM Sebastien Lecornu Resign
France Political Crisis : पॅरिस : फ्रान्समध्ये (France) मोठे राजकीय संकट कोसळले आहे. फ्रान्सचे नवे पंतप्रधान सेबॅस्टिन लेकोर्नू यांनी सोमवारी (०६ ऑक्टोबर) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे फ्रान्सच्या राजकारणात गोंधळ उडाला आहे. तसेच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन ( Emmanuel Macron) यांना सेबॅस्टिन यांच्या राजीनाम्याने मोठा धक्का बसला आहे. सध्या मॅक्रॉन चिंतेत आहेत.
यामागचे कारण म्हणजे सेबॅस्टिन यांना एक महिन्यापूर्वीच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान म्हणून नियुक्त केले होते. पण यामुळे मंत्रीमंडळात वाद निर्माण झाला होता. सेबॅस्टिन यांच्या राजीनाम्याने युरोपियन युनियनमध्ये राजकीय संकेट उभे राहिले आहे. गेल्या दोन वर्षामध्ये फ्रान्सच्या चार पंतप्रधानांनी राजीनामा दिला असून लेकोर्नू हे पाचवे पंतप्रधान ठरले आहेत.
सेबॅस्टिन यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनसोबत अनेक राजकीय कार्य केली आहेत. पण रविवारी (०५ ऑक्टोबर) त्यांनी त्यांच्या नव्या मंत्रीमंडळाची घोषणा केली. या मंत्रीमंडळात अनेक जुने चेहेरे होते. यामध्ये फ्रान्सचे माजी पंतप्रधान फ्रॅंकोइस बायरो यांना देखील समील करण्यात आले होते. यावर उडव्या विचारसरणीच्या मित्रपक्षाने नाराजी व्यक्त केली होती. त्यांना सराकरमधून माघार घेण्याचे संकेत देण्यात आले होते. यामुळे दबावाखाली लेकोर्नू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
लेकोर्नू यांच्या राजीनाम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. ते सर्वात कमी कालावधीत (२७ दिवस) राजीनामा देणार पहिले पंतप्रधान ठरले आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या एक महिन्याच्या कार्यकाळात कोणताही धोरणात्मक बदल केलेला नाही. तसेच त्यांच्या पदाभार स्वीकारल्याच्या २६ दिवसानंतर मंत्रीमडळाची घोषणा करण्यात आली. यामुळे त्यांच्या राजीनाम्यावर अत्यंत गंभीर चिंता आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लेकोर्नू यांनी सरकारमध्ये नवीन नेतृत्त्व उभारण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांनी मंत्रीमंडळात जुने आणि मॅक्रॉन यांच्या जवळच्या लोकांचा समावेश केला. यामुळे उडव्या विचारसरणीच्या मित्र पक्षामध्ये संतापाची लाट उसळली. उजव्या विचारसरणीच्या नेत्या मरीने ले पेन यांनी त्यांच्या मंत्रीमंडळा दयनीय संबोधले होते. तसेच नॅशनल रॅलीच्या तरुण नेत्या जॉर्डना बार्डेला यांनी देखील याची खिल्ली उडवली होती. लेकोर्नू यांचे सरकारमध्ये आधीच कमी लोक होते. यामुळे सरकार लगचे कोसळले.
सध्या लेकोर्नू यांच्या राजीनाम्याने मॅक्रॉन यांची चिंता वाढली आहे. यापूर्वी बायरो आणि बार्नियर यांनाही देशाच्या अर्थसंकल्पात तूट रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे पदावरुन काढून टाकले होते. सध्या युरोपिनयन देशात फ्रान्स मोठ्या आर्थिक संकटात आहे. अशा कठीण काळात लेकोर्नू यांचा राजीनामा इमॅन्युएल मॅक्रॉनसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. आता मॅक्रॉन पुढचे पंतप्रधान म्हणून कोणला नियुक्त करार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रश्न १. फ्रान्सच्या राजकारणात का सुरु आहे गोंधळ?
फ्रान्सचे नवे पंतप्रधान सेबॅस्टिन लेकोर्नू यांनी सोमवारी (०६ ऑक्टोबर) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, ज्यामुळे फ्रान्सच्या राजकारणात गोंधळ सुरु आहे.
प्रश्न २. पंतप्रधान सेबॅस्टिन लेकोर्नू यांनी किती दिवसात दिला राजीनामा?
फ्रान्सचे नवे पंतप्रधान सेबॅस्टिन लेकोर्नू यांनी केवळ २७ दिवसात राजीनामा दिला आहे.
प्रश्न ३. फ्रान्सचे नवे पंतप्रधान सेबॅस्टिन लेकोर्नू यांनी का दिला पदाचा राजीनामा?
फ्रान्सचे नवे पंतप्रधान सेबॅस्टिन लेकोर्नू यांनी मंत्रीमंडळात जुने आणि मॅक्रॉन यांच्या जवळच्या लोकांना सामील केले होते. यामुळे उजव्या विचारसरणीच्या पक्षाकडून त्यांच्यावर टीका केला जात होता. यामुळे लेकोर्नू यांनी राजीनामा दिला.
प्रश्न ४. फ्रान्समध्ये किती पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे?
गेल्या दोन वर्षात फ्रान्समध्ये पाच पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे.