G-7 Summit Why did Trump get angry at French President Emmanuel Macron
G-7 Summit news marathi : ओटावा : सध्या कॅनडामध्ये G-7 शिखर परिषद पार पडत आहे. परंतु या परिषेदतून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निघून गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही परिषद अर्ध्यावरच सोडली आहे. यामुळे संपूर्ण खळबळ उडाली आहे. दरम्यान ट्रम्प परिषदत सोडून गेल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी इस्रायल आणि इराणमधील युद्धबंदीवर काम करण्यासाठी ट्रम्प गेले असल्याचे म्हटले.
त्यांच्या या टीकेनंतर ट्रम्प यांनी मॅक्रॉन यांना कडक शब्दात फटकारले आहे. त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ट्रम्प यांनी मॅक्रॉन यांच्यावर संताप व्यक्त केली आहे. त्यांनी मॅक्रॉन प्रसिद्धीसाठी काहीही चुकीचे बोलत असल्याचे म्हटले आहे. तसेच ट्रम्प परिषद का सोडून गेले यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर मॅक्रॉन यांच्या टीकेला पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रसिद्धीसाठी अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी चुकून मी इस्रायल आणि इराणधील युद्ध थांबवण्यासाठी गेले असल्याचे म्हटले. मी वॉशिंग्टन डीसीला परत जात आहे, परंतु इस्रायल आणि इराणमधील युद्धबंदीसाठी नव्हे तर मी त्यापेक्षा काहीतरी मोठे करणार आहे. मॅक्रॉन नेहमीच चुकीचे निष्कर्ष काढतात.
याच वेळी ट्रम्प यांनी इराणला तेहरान सोडण्यास सांगितले आहे. इराणने अमेरिकेसोबत अणु करार केला असता तर इस्रायलचे हल्ले टाळता आले असते असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांनी हा करार तणाव कमी करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. नाहीतर संघर्ष वाढण्याची भीती ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.
याच वेळी G-7 परिषदेच्या अमेरिका, इटली, फ्रान्स, जपान, जर्मनी, कॅनडा आणि ब्रिटन या देशांनी इराण आणि इस्रायल युद्धात इस्रायलला पाठिंबा दिला आहे. तसेच इराणला आण्विक शस्त्रे बनवण्यास परवानगी नसल्याचे परिषदेच्या नेत्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील अयातुल्ला खामेंनीबद्दल खळबळजनक विधान केले आहे. नेतन्याहूंनी खामेनींच्या हत्येनंतरच संघर्ष थांबेल असे म्हटले आहे.
सध्या दोन्ही देशांतील संघर्षाने भयंकर पेट घेतला आहे. जागतिक स्तरावर दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाहीत. यामुळे दोघांचेही प्रचंड नुकसान होत आहे. हा संघर्ष असाच सुरु राहिला तर भयंकर युद्ध भडकण्याची शक्यता आहे.