
Germany Mass Shooting stade
मिळालेल्या माहितीनुसार, स्टाड शहरातील डँकर्सश्ट्रासे परिसरात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, शहराच्या मध्यवर्ती भागातील एका युवक केंद्राजवळ गोळीबार (Firing) झाला. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. अनेकांनी गोळीबाराचे आवाज ऐकल्याचे सांगितले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि आपत्कालनी पथके घटनास्थळी दाखल झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त केला असून नागरिकांना दूर राहण्याचे आवाहन केले आहे. बचाव कार्यात आणि तपासात अडथळा होऊ नये यासाठी संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु यामध्ये वृद्ध व्यक्तींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या हल्ल्यात काही लोक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची संख्या आणि त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
गेल्या आठ महिन्यात जर्मनीतील ही चौथी मोठी गोळीबाराची घटना आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये बव्हेरियातील स्ट्रुलेंडॉर्फ येथे एका व्यक्तीने पत्नी आणि मुलाची गोळी झाडून हत्या केली होती. तर जानेवारी २०२६ मध्ये बर्लिनमधील टियरगार्टन परिसरात कौटुंबिका वादातून गोळीबार झाला होता. ज्यामध्ये चार जण जखमी झाले होते. यापूर्वी देखील एका व्यक्तीने आपल्या बहीणीच्या हत्याकरुन स्वत:च्या दोन मुलांचा जीवही घेत आत्महत्या केली होती.
नुकतेच सोमवारी झालेली घटना वैयक्तिक वाद, पूर्वनियोजित कट किंवा अन्य कोणते कारण होते हे अद्याप स्पष्ट झाली. पोलिसांनी याचा तपास सुरु केला आहे. ताब्यात घेतलेल्या दोन संशयितांची चौकशी झाल्यानंतरच हल्ल्याचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.
US Iran Talks : ट्रम्प यांचा दावा हवेत? अमेरिकेसोबतच्या दोहा चर्चेला इराणचा स्पष्ट नकार; युद्ध अटळ?