Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

100 दशलक्ष जनतेला हिरवा कंदील! Trump यांनी लाँच केले ‘Gold Card’; जाणून घ्या $1 दशलक्ष गुंतवणुकीवर कसे मिळणार नागरिकत्व

US Gold Card Visa Rules: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'गोल्ड कार्ड' योजना सुरू केली आहे, जी परदेशी गुंतवणूकदारांना 1 दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीवर अमेरिकेत कायमस्वरूपी नागरिकत्व...

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 11, 2025 | 01:23 PM
Give 100 million citizenship Trump launches Gold Card makes shocking statement on immigration

Give 100 million citizenship Trump launches Gold Card makes shocking statement on immigration

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गोल्ड कार्ड’ (Gold Card) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, जी मोठ्या परदेशी गुंतवणूकदारांना अमेरिकेत कायमस्वरूपी निवास (Permanent Residency) आणि नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग देते.
  •  गोल्ड कार्ड मिळवण्यासाठी परदेशी नागरिकांनी $१ दशलक्ष (सुमारे ८.३० कोटी रुपये) वैयक्तिक गुंतवणूक किंवा त्यांच्या कंपनीद्वारे $२ दशलक्ष (सुमारे १६.६० कोटी रुपये) गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
  •  ही योजना जुनी EB-5 व्हिसा योजनेचा (EB-5 Investor Visa) एक सुधारित पर्याय मानली जाते. गोल्ड कार्डसाठी जलद मंजुरीचा दावा केला गेला असून, यासाठी $१५,००० पडताळणी शुल्क (Verification Fee) निश्चित करण्यात आले आहे.

US Gold Card Visa Rules : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे त्यांच्या कठोर इमिग्रेशन (Immigration) आणि व्हिसा धोरणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी ‘गोल्ड कार्ड’ नावाची एक नवीन, परंतु अत्यंत महागडी योजना सुरू करून इमिग्रेशनवर धक्कादायक विधान केले आहे. या योजनेचा उद्देश मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवू शकणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांना अमेरिकेत कायदेशीर दर्जा आणि शेवटी नागरिकत्व (Citizenship) देणे हा आहे.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “ट्रम्प गोल्ड कार्ड आता उपलब्ध आहे आणि पात्र तसेच सत्यापित व्यक्तींसाठी नागरिकत्वाचा थेट मार्ग (Direct Path) प्रदान करते.” त्यांच्या मते, ही योजना अमेरिकन कंपन्यांना त्यांचे मौल्यावान आणि प्रतिभावान कर्मचारी दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास सक्षम करेल. अनेक कठोर इमिग्रेशन नियम लागू केल्यानंतर ही घोषणा करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Trade: जागतिक व्यापार युद्धाचे नवे पर्व! अमेरिकेनंतर आता ‘या’ देशानेही लावला भारतावर 50% Tariff; ‘हा’ नवा नियम लागू होणार

 मोठी गुंतवणूक, कायमस्वरूपी निवास

गोल्ड कार्ड योजना ही जुन्या EB-5 गुंतवणूकदार व्हिसा योजनेचा एक नवीन पर्याय मानली जाते. या योजनेनुसार, जर एखाद्या परदेशी नागरिकाने $१ दशलक्ष (एक मिलियन डॉलर्स) वैयक्तिकरित्या किंवा त्यांच्या कंपनीद्वारे $२ दशलक्ष गुंतवणूक केली, तर त्यांना अमेरिकेत कायमस्वरूपी निवास (Permanent Residency) मिळू शकतो. अनेक तज्ञांचे म्हणणे आहे की, ही योजना मूलतः ग्रीन कार्डची (Green Card) सुधारित आणि जलद आवृत्ती आहे. ज्यांना गोल्ड कार्ड मिळते, त्यांना अमेरिकेत अनिश्चित काळासाठी राहण्याची आणि काम करण्याची परवानगी दिली जाईल आणि भविष्यात ते नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतील. व्हिसाच्या उपलब्धतेनुसार, गोल्ड कार्ड धारकांना EB-1 किंवा EB-2 व्हिसा श्रेणींमध्ये कायमस्वरूपी निवासस्थान दिले जाईल.

#WATCH | US President Donald J Trump says, “Very excitingly for me and for the country, we’ve just launched the Trump Gold Card. The site goes up in about 30 minutes, and all funds go to the United States government… It’s somewhat like a green card, but with big advantages over… pic.twitter.com/JbOM80GLvT — ANI (@ANI) December 10, 2025

credit : social media and Twitter 

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Bhutan Trade : भूतानचा 80% व्यापार भारतासोबत! विश्वासाचे बंध अधिक दृढ; रेल्वे कनेक्टिव्हिटीवरील करारामुळे जवळीक वाढली

 ग्रीन कार्ड आणि गोल्ड कार्डमध्ये काय आहे मुख्य फरक?

ग्रीन कार्ड मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत, जसे की नोकरी प्रायोजकत्व (Sponsorship), व्हिसा लॉटरी किंवा EB-5 गुंतवणूक (ज्यासाठी किमान $८,००,००० ची गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती आवश्यक आहे). याउलट, गोल्ड कार्डसाठी किमान $१ दशलक्षची गुंतवणूक आवश्यक आहे आणि ते जलद मंजुरी (Faster Approval) देतात, असा दावा केला जातो. गोल्ड कार्डसाठी अर्ज करण्यासाठी $१५,००० (सुमारे १२.५ लाख रुपये) इतके मोठे पडताळणी शुल्क (Verification Fee) निश्चित करण्यात आले आहे, ज्यामुळे अर्जदारांची पार्श्वभूमी कठोरपणे तपासली जाईल. तज्ञांचा असा विश्वास आहे की ही योजना मोठ्या कंपन्यांसाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु प्रत्येक कार्ड फक्त एका कर्मचाऱ्यासाठी वैध असल्याने लहान कंपन्यांना याचा फारसा उपयोग होणार नाही. ट्रम्प यांचे हे धोरण ‘कठीण इमिग्रेशन नियम’ आणि ‘गुंतवणुकीवर आधारित नागरिकत्व’ या दोन टोकांच्या धोरणांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'गोल्ड कार्ड' योजनेत किती गुंतवणूक आवश्यक आहे?

    Ans: वैयक्तिक $१ दशलक्ष किंवा कंपनीद्वारे $२ दशलक्ष.

  • Que: गोल्ड कार्ड धारकांना अमेरिकेत काय मिळते?

    Ans: कायमस्वरूपी निवास (Permanent Residency) आणि नागरिकत्वाचा मार्ग.

  • Que: ही योजना कोणत्या जुन्या व्हिसा योजनेचा पर्याय आहे?

    Ans: EB-5 गुंतवणूकदार व्हिसा योजनेचा.

Web Title: Give 100 million citizenship trump launches gold card makes shocking statement on immigration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 01:23 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Gold
  • Illegal immigration
  • International Political news

संबंधित बातम्या

India-Canada: मार्क कार्नी आणि ट्रम्प यांच्यात मतभेदांचे रण पेटले; US च्या 100% टॅरिफवर कॅनडाचे ‘Buy Canadian’ने प्रतिउत्तर
1

India-Canada: मार्क कार्नी आणि ट्रम्प यांच्यात मतभेदांचे रण पेटले; US च्या 100% टॅरिफवर कॅनडाचे ‘Buy Canadian’ने प्रतिउत्तर

Syria Ceasefire : सीरियात 15 दिवसांची ‘शांतता’! 9,000 ISIS दहशतवाद्यांच्या नशिबाचा फैसला होणार; अमेरिकेचा मोठा प्लॅन
2

Syria Ceasefire : सीरियात 15 दिवसांची ‘शांतता’! 9,000 ISIS दहशतवाद्यांच्या नशिबाचा फैसला होणार; अमेरिकेचा मोठा प्लॅन

Venezuela Political Crisis : गद्दारी की मुत्सद्देगिरी? Maduro च्या अटकेमागे डेल्सी रॉड्रिग्ज यांचा हात? लीक ऑडिओमुळे खळबळ
3

Venezuela Political Crisis : गद्दारी की मुत्सद्देगिरी? Maduro च्या अटकेमागे डेल्सी रॉड्रिग्ज यांचा हात? लीक ऑडिओमुळे खळबळ

अमेरिकेत कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; व्यक्तीने भारतीय वंशाच्या पत्नीसह ४ नातेवाईकांना केलं ठार, नेमकं काय घडलं?
4

अमेरिकेत कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; व्यक्तीने भारतीय वंशाच्या पत्नीसह ४ नातेवाईकांना केलं ठार, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.