
फोटो सौजन्य AI
अमेरिकेचा १० वर्षाचा ट्रेझरी यिल्ड हा जगातील अनेक कर्जदारांसाठी महत्वाचा बेंचमार्क मानला जातो . सध्या तो सुमारे ४.८ टाक्यांवर पोहोचला असून २०२३ नंतरची ही उच्च पातळी आहे . यिल्ड वाढण्याचा अर्थ बॉन्डच्या किमती कमी होणे आणि सरकारला नवीन कर्जासाठी अधिक व्याज द्यावे लागणे असा होतो .
याचा परिणाम कंपन्यांच्या कर्जापासून गृहकर्ज आणि इतर कर्जदारांपर्यंत होऊ शकतो . या परिस्थितीमुळे अमेरिकेतील गुंतवणूकदारांचेच न्हवे तर जगभरातील वित्तीय बाजारांचे लक्ष ट्रेझरी यिल्डकडे लागले आहे . ५ टक्क्यांच्या दिशेने होणारी आणखी वाढ बाजारातील अस्थिरता वाढवू शकते .
Iran News : आखातात इंधन तस्करीचा पर्दाफाश; ३.८२ लाख लिटर इंधन जप्त, ११ जण अटकेत
सध्याच्या बॉन्ड बाजारातील अस्थिरतेमागे मध्यपूर्वेतील संघर्षाचाही मोठा वाटा आहे . अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्या बाबत चिंता वाढली असून , ब्रेंट क्रूडची किंमत बुधवारी काही वेळेस जवळपास ९७ डॉलरपर्यंत पोहोचली .
तेल महाग झाल्यास वाहतूक , उत्पादन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता असते . त्यामुळे महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँकांना व्याजदर वाढवण्याचा दबाव येऊ शकतो . व्याजदर वाढण्याची शक्यता वाढली कि बॉन्ड यिल्डमधे आणखी वाढ होऊ शकते . त्यामुळे बाजारात सध्या महागाई आणि व्याजदरांचे गणित अत्यंत्य महत्वाचे ठरले आहे .
Pakistan–Iran : अमेरिकेच्या निर्बंधांना पाकिस्तानचा ठेंगा; व्यापार सुरूच
ही समस्या केवळ अमेरिकेपुरती मर्यादित राहिलेली नाही . जपानच्या १० वर्षाच्या सरकारी बॉन्डचा यिल्ड ३ टक्क्यांवर पोहोचला असून १९९६ नंतर प्रथमच एवढी पातळी गाठली आहे . ब्रिटन , जर्मनी आणि फ्रान्समध्ये दीर्घकालीन कर्जाचे दर अनेक वर्षांच्या उच्चाकांजवळ आहेत .
सरकारी कर्ज वाढत असताना त्यावरील व्याजाचा खर्चही वाढतो . त्याचवेळी AI क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांकडून डेटा सेंटर आणि तंत्रज्ञानासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज उभारले जात आहे . त्यामुळे उपलब्ध भांडवलासाठी स्पर्धा वाढत असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे .