
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
काही बँका ऑगस्ट २०२६ मध्ये ७% पासून सुरू होणारे होम लोन देत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँका यात आघाडीवर आहेत. २६ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या पैसा बाजारच्या आकडेवारीनुसार, बँक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया ७% पासून सुरू होणारे गृहकर्ज देत आहेत. बँक ऑफ इंडियामध्ये गृहकर्जाचे व्याजदर ७.१०% पासून सुरू होतात, तर युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया ७.१५% पासून सुरू होणारे दर देतात. कॅनरा बँक ₹३० लाखांपर्यंतचे कर्ज ७.२५% दराने देते, तर ₹७५ लाखांवरील कर्जासाठी हा दर ७.१५% पर्यंत वाढतो. स्टेट बँक ऑफ इंडिया सर्व कर्ज स्लॅबवर ७.२५% चा सुरुवातीचा व्याजदर देत आहे.
प्रायव्हेट म्हणजेच खाजगी बँकांमध्ये, साऊथ इंडिया बँक सर्वात कमी ७.२५% च्या सुरुवातीच्या व्याजदराने गृहकर्ज देत आहे. तर कर्नाटक बँक ७.४८% आणि आयसीआयसीआय बँक ७.५५% दराने कर्ज देत आहे. एचडीएफसी बँक ७.७५% च्या सुरुवातीच्या दराने कर्ज देते, तर ॲक्सिस बँक ८% पासून गृहकर्ज देते. आरबीएल बँक ९% च्या सुरुवातीच्या दराने कर्ज देते आहे. त्यामुळे याचा फायदा तुम्ही घेऊन शकता.
हाउसिंग फाइनान्स कंपनी कमी व्याजदरात गृहकर्ज देखील देत आहेत. एलआयसी हाउसिंग फायनान्स ७.१५% पासून सुरू होणारे गृहकर्ज देतंय तर बजाज हाउसिंग फायनान्स ७.२५% पासून सुरू होणारे गृहकर्ज देते. आणि आयसीआयसीआय होम फायनान्स ७.५०% दराने देते. पीएनबी हाउसिंग फायनान्स ३० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी ७.७५% चा सुरुवातीचा दर देते.
जाहिरातीत दाखवलेला सर्वात कमी व्याजदर प्रत्येक ग्राहकाला मिळेलच असे नाही. व्याजदर ठरवताना बँका ग्राहकाचे क्रेडिट प्रोफाइल, उत्पन्न, नोकरीचे पद, कर्जाची रक्कम आणि इतर क्षमता यांसारख्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे, कर्ज घेण्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांच्या ऑफर्सची नक्की तपासा आणि तुलना करणं तितकंच महत्त्वाचं आहे.
केवळ व्याजदरच नाही, तर यामध्ये वेगवेगळे शुल्क पण आकरले जातात. त्यांच्यावर लक्ष्य देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यात प्रक्रिया शुल्क, इतर शुल्क आणि कर्जाच्या मुदतीत भरावे लागणारे एकूण व्याज यांचाही विचार केला पाहिजे. मोठ्या, दीर्घ मुदतीच्या गृहकर्जांसाठी, व्याजदरातील अगदी लहान फरकामुळेही एकूण देय रकमेत मोठा फरक पडू शकतो.