
Great Wall of China damaged China Great Wall coal mining damage
चीनची ओळख असणारी आणि जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानली जाणारी ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’ (Great Wall Of China)चीनची महान भिंत पुन्हा एकदा एका गंभीर संकटामुळे चर्चेत आली आहे. चीनचे लष्करी सामर्थ्य आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या या भिंतीला एका कोळसा खाणकाम करणाऱ्या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान पोहोचले आहे. भिंतीच्या जवळ सुरू असलेल्या खाणकामादरम्यान त्यात तब्बल १९ फूट (सुमारे ६ मीटर) खोल आणि रुंद छिद्र पाडण्यात आले असून या घटनेमुळे जगभरातील इतिहासप्रेमी आणि चिनी प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे नुकसान चीनच्या गुओजियाओ (शांक्सी प्रांत) परिसरातील ऐतिहासिक भिंतीच्या भागात झाले आहे. या भागात २००७ मध्ये स्थानिक प्रशासनाने एका खाजगी कंपनीला कोळसा खाणकामासाठी मंजुरी दिली होती. कंत्राट घेताना संबंधित कंपनीला या ऐतिहासिक वारशाचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, खाणकाम सुरू झाल्यानंतर कंपनीने केवळ स्वतःच्या फायद्यासाठी आणि खाणीतील कचरा (स्लॅग) बाहेर टाकण्यासाठी भिंतीच्या एका भागात लहान छिद्र पाडले.
काळानुसार आणि सातत्याने होत राहिलेल्या बेकायदेशीर वापरामुळे हे लहान छिद्र हळूहळू विस्तारत गेले. २०१५ मध्ये पहिल्यांदाच स्थानिक रहिवासी आणि काही पर्यटकांच्या हे लक्षात आले. परंतु, वेळेवर योग्य पावले न उचलल्यामुळे आज या छिद्राचे रूपांतर सुमारे १९ फूट खोल विवरात झाले आहे. चिनी सरकारी वृत्तवाहिनी ‘सीसीटीव्ही’ (CCTV) ने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार, ही घटना म्हणजे खाण कंपनीचा अत्यंत बेजबाबदारपणा आणि स्थानिक यंत्रणेचा निष्काळजीपणा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Rooppur Nuclear Plant: बांगलादेशच्या प्रगतीवर पाकिस्तानचा जळफळाट; रशियन युरेनियम विमान रोखले, ढाकावर ओढवणार विजेचे संकट
या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर पुरातत्व तज्ज्ञांनी चिनी सरकारला तातडीने अहवाल सादर केला. तज्ज्ञांच्या मते, १३६८ ते १६४४ या काळात म्हणजेच प्रसिद्ध ‘मिंग राजवंशाच्या’ (Ming Dynasty) काळात बांधलेल्या या भिंतीचे नुकसान भरून काढणे अत्यंत कठीण आहे. संपूर्ण जगासाठी हा एक ऐतिहासिक वारसा असून उत्तर चीनमधून जाणारी सुमारे २१,००० किलोमीटर लांब भिंत चीनच्या संरक्षणासाठी व पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
A section of the Ming Great Wall in Shanxi was cut through by a coal mining company, just in order to shorten the route and reduce transportation costs, leaving an 18-meter-wide breach.
This damage can be traced back to 2007 and massive destruction lasted from 2014 till… pic.twitter.com/NJtNNYpllw — Jack man (@Xm_maher84) September 23, 2026
credit – social media and Twitter
घटनेची गांभीर्य ओळखून चिनी सरकारने तात्काळ कडक पावले उचलली आहेत. दोषी आढळलेल्या कोळसा खाणकाम कंपनीचे काम त्वरित थांबवण्यात आले असून कंपनीवर तब्बल $१५०,००० (सुमारे सव्वा कोटी रुपये) इतका मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच, या बेकायदेशीर कृत्यात सहभागी असलेल्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mojtaba Khamenei : हवाई हल्ल्यात जखमी, रुग्णालयाचा विध्वंस अन् सुटका; अमेरिकन हल्ल्यातून कसे वाचले मोजतबा खामेनी?
चीन सरकारने २००६ मध्येच ग्रेट वॉल ऑफ चायनाच्या सुरक्षेसाठी एक स्वतंत्र आणि विशेष कायदा लागू केला होता. या कायद्यानुसार, या ऐतिहासिक भिंतीला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवणे, तिच्या लगत अवैध बांधकाम करणे किंवा परवानगीशिवाय उत्खनन करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा मानला जातो. या परिसरात केवळ अत्यंत आवश्यक सुरक्षा कारणास्तव बोगदे बांधण्याची परवानगी दिली जाऊ शकते, परंतु भिंतीची कोणतीही इमारत पाडणे किंवा तिला नुकसान पोहोचवणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या कायद्याचे उल्लंघन झाल्यामुळेच चिनी सरकारने ही कठोर कारवाई केली आहे. सध्या या दुर्घटग्रस्त भागाची तातडीने डागडुजी करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे.