‘Hands Off!’ protest People take to the streets in America against Trump-Musk! Who are these organizations that are protesting fiercely
वॉशिंग्टन: सध्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळे जगभरात गोंधळ सुरुच आहे. पण दुसरीकडे त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये ट्रम्प विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या विरोधात लाखो लेक उतरले असून “Hands Off” आंदोलन सुरु आहे. ट्रम्प-मस्क गो बॅकच्या घोषणा दिल्या जात आहेत.
ट्रम्प यांच्या मनमानी कारभारामुळे अमेरिकन लोक संतापले आहेत. देशातील 50 राज्यांमध्ये 150 हून अधिक गट त्यांच्याविरोधात आहेत. निदर्शने टॅरिफ, टाळेबंदी अर्थव्यवस्था, मानवी हक्क, यासांरख्या मुद्द्यांवरुन सुरु आहेत. तसेच निषेध करणाऱ्यांमध्ये नागरी हक्क गट, कामगार संघटना, LGBTQ आणि महिला हक्क गट समाविष्ट आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे संपूर्ण अमेरिका संतप्त झाली आहे. कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर लाखो लोकांचे आंदोलन सुरु आहे. लोकांनी ट्रम्पने देश उदध्वस्त केल्याचा आरोप करत आहे.
डोनाल्ड ट्रम्प विरोधात “Hands Off” निषेधाचे आयोजनही करण्यात आला होता. यामध्ये इंडिव्हिझिबल, मूव्हऑन आणि महिलांच्या मोर्चाचा समावेश होते. रविवारी (06 एप्रिल) ट्रम्प विरोधात देशभरात 1400 हून अधिक रॅलींचे आयोजन करण्यात आले होता. या निदर्शनांमध्ये सुमारे सहा लाख लोकांनी आपला सहभाग घेतला होता. निषेधाच नाव “Hands Off” ठेवण्यात आले होते. या आंदोलनाद्वारे लोकांनी कोणाच्याही अधिकारावर दुसऱ्याचे नियंत्रण नसावे असे दाखवून दिले होते.
🇺🇸 AMERICA IS RISING
Over 1200 ‘Hands Off’ protests are taking place across America as people rise against the Trump-Musk regime
This is from Boston, where thousands have gathered pic.twitter.com/6F1764xrDT
— Melissa T. Brown (@melissatuna4) April 6, 2025
ट्रम्प विरोधात लाखो लोक रस्त्यावर इतरले असून न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या तोंडावर लोकांनी प्रतीकात्मक पट्ट्या बांधून विरोध दर्शवला आहे. युटा कॅपिटल हिलच्या बाहेर देखील मोठी आंदोलने सुरु आहेत. वॉशिंग्टन स्मारकाजवळ, तसेच मॅनहॅटनमध्ये सर्व रस्ते गर्दीने भरलेले आहेत. मॅनहॅटनपासून ते अँकरेज, अलास्का पर्यंतच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हे आंदोलन सुरु आहे. अमेरिकन लोकशाही आणि समाजासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची धोरण अतिशय घातक ठरत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
यापूर्वी 2017 मध्य़े महिला मार्च, 2020 मध्ये ब्लॅक लाईव्हज मॅटर चळवळ हे देखील ट्रम्प विरोधातील सर्वात मोठे निदर्शन होते. या निदर्शनानंतर सध्याचे आंदोलन देखील ट्रम्प विरोधात आहे. ट्रम्प प्रशासने आर्थिक, कामगार स्थलातर आणि मानवी हक्कांच्या धोरणांवरील घेतलेल्या भूमिकेने मोठा वाद उफाळला आहे.
मीडियी रिपोर्टनुसार, ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे अनेक जीवनावश्यक वस्तू देखील महागल्या आहेत. परदेशी कंपन्यांचे उत्पादने अमेरिकेत महाग होत असल्याने, याचा थेट परिणाम अमेरिकन मध्यमवर्गावर होत आहे. यामुळे अनेकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.