डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क विरोधात लोकांचा रोष शिगेला; अमेरिकेत 1200 ठिकाणी 'Hands off' आंदोलनाने घेतले उग्र वळण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क यांच्या धोरणांविरोधात संतप्त निदर्शने उफाळून आली आहेत. देशभरातील ५० राज्यांमध्ये तब्बल १२०० पेक्षा जास्त ठिकाणी ‘हँड्स ऑफ’ आंदोलन करण्यात आले. न्यूयॉर्कपासून अलास्कापर्यंत हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले, ज्यामध्ये नागरी हक्क संघटना, कामगार संघटना, LGBTQ+ समुदायाचे समर्थक, निवडणूक कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
या निषेध आंदोलनाने अमेरिकेतील रिपब्लिकन राजवटीच्या पहिल्याच आठवड्यात मोठी खळबळ उडवली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या नव्या धोरणांविरोधात आणि एलोन मस्कच्या ‘DOGE’ विभागातील निर्णयांविरुद्ध नागरिक आक्रमक झाले आहेत. आंदोलन शांततेत पार पडले असून, कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.
शनिवारी (५ एप्रिल) अमेरिकेच्या विविध शहरांमध्ये निदर्शने झाली. मिडटाऊन मॅनहॅटन (न्यूयॉर्क) पासून अँकरेज (अलास्का) पर्यंत हजारो लोकांनी ट्रम्प आणि मस्क यांच्या विरोधात घोषणा दिल्या. लोकांनी फलक, बॅनर्स आणि पोस्टर्स घेऊन निदर्शने केली, ज्यावर “Hands Off Democracy”, “Fight for Rights”, “Stop the Oligarchy” अशा घोषणा लिहिल्या होत्या. निदर्शकांनी फेडरल एजन्सीमधील मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना हटवण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या धोरणावर जोरदार टीका केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US strikes on Houthi: अमेरिकेने अवघ्या 25 सेकंदात केला हुथींचा तळ उद्ध्वस्त! ट्रम्पने शेअर केला VIDEO
अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, स्थलांतर धोरण, नागरी हक्कांचे उल्लंघन आणि सरकारी एजन्सीतील कर्मचाऱ्यांची अचानक केली गेलेली कपात यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष दिसून आला. एलोन मस्क यांच्या DOGE (Department of Government Efficiency) विभागाच्या निर्णयांवरही आंदोलनकर्त्यांनी टीका केली, कारण सरकारी खर्च कपातीच्या नावाखाली अनेक लोकांना नोकऱ्यांवरून हटवले जात आहे.
आंदोलनकर्त्यांचा मुख्य आरोप :
ट्रम्प प्रशासन लोकशाही धोक्यात आणत आहे.
DOGE विभागाच्या निर्णयांमुळे नागरिकांना आर्थिक अडचणी येत आहेत.
मानवी हक्कांवर गदा आणली जात आहे.
अमेरिकेतील स्थलांतर धोरण अधिक कडक करून निर्वासितांना अडवले जात आहे.
🇺🇸 AMERICA IS RISING
Over 1200 ‘Hands Off’ protests are taking place across America as people rise against the Trump-Musk regime
This is from Boston, where thousands have gathered pic.twitter.com/6F1764xrDT
— Melissa T. Brown (@melissatuna4) April 6, 2025
credit : social media
लॉस एंजेलिसमध्ये पर्शिंग स्क्वेअर ते सिटी हॉलपर्यंत हजारोंच्या संख्येने निदर्शकांनी मार्च काढला. लोक ट्रम्प प्रशासनाच्या अल्पसंख्याक आणि स्थलांतरितांविरोधातील कडक धोरणांवर आक्रमक झाले. तसेच, अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर सिएटलच्या स्पेस नीडलजवळ निदर्शकांनी “Fight for All” अशा घोषणा दिल्या. पोर्टलँड, ओरेगॉन येथे देखील मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘तो वेडा आहे…’ अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प विरोधात हजारो लोकांची निषेध रॅली, कारण काय?
हे निदर्शने शांततेत पार पडली असली, तरी ट्रम्प प्रशासन आणि एलोन मस्क यांच्या धोरणांमुळे अमेरिकेत असंतोष वाढत आहे. आता हे आंदोलन आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय बनले असून, विविध माध्यमांनी याला मोठे कव्हरेज दिले आहे. आगामी काही दिवसांत ट्रम्प आणि मस्क यांच्या धोरणांमध्ये काही बदल होतो का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.