इस्त्रायलवर हिजबुल्लाहचे ड्रोन हल्ले
जेरूसेलम: इस्त्रायली सैन्य दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहविरूद्ध सातत्याने हवाई हल्ले करत आहे. यामुळे लेबनॉनच्या दक्षिण भागात इस्रायल आणि हिजबुल्लाहच्या लष्करामध्ये भीषण जमीनी आणि हवाई युद्ध सुरू आहे. दरम्यान, या हल्ल्यांचे प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लाहने रविवारी रात्री इस्त्रायलच्या लष्करी तळांना लक्ष्य करत प्राणघातक ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यांमध्ये चार सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 60 जवान जखमी झाले आहेत. या सर्वांना हेलिकॉप्टरच्या मदतीने रूग्णालयात नेण्यात आले आहे. अशी माहिती इस्त्रायली सैन्याने सैनिकांच्या कुटूंबीयांना दिली आहे.
हल्ल्याची जबाबदारी हिजबुल्लाहने घेतली
इस्त्रायलवरील ड्रोनच्या हल्ल्याची जबाबदारी हिजबुल्लाहने घेतली आहे. याबाबत त्यांनी एक निवेदन जारी केले. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, बेरूतमध्ये इस्त्रायलने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही हे आत्मघाती ड्रोन हल्ले केले आहेत. हिजबुल्लाने इस्त्रायलच्या लष्करी प्रशिक्षण क्षेत्रावर लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात 22 जण ठार झाल्याता दावा अमेरिका संघटनेने केला आहे. इस्त्रायलवर दोन दिवसांत झालेला हा दुसरा ड्रोन हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याआधी शनिवारी तेल अवीवच्या उपनगरात ड्रोन हल्ले करण्यात आले होते.
हे देखील वाचा- इस्रायलचा दक्षिण लेबनॉनमधे कब्जा करण्याचा प्रयत्न; IDF ने गाझावरही केला हल्ला
हिजबुल्लाहचे इस्त्रायलवर आत्मघाती ड्रोन हल्ले
इस्त्रायसमधील मीडिया रिपोर्टनुसार, हिजबुल्लाहने इस्त्रायलच्या लष्करी तळांवर दोन आत्मघाती ड्रोन हल्ले केले आहेत. हे ड्रोन समुद्रामार्गे इस्त्रायलमध्ये प्रक्षेपित करण्यात आले. आत्मघाती मिरसाद ड्रोन जो हिजबुल्लाहचा सर्वात शक्तिशाली ड्रोन आहे. या ड्रोनला इराणमध्ये अबाबिल-टी म्हणून ओळखले जाते. इस्रायली रिसर्च इन्स्टिट्यूट अल्मा सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहने केलेल्या या आत्मघाती ड्रोनमध्ये 120 किलोमीटर वेगाने हल्ला करण्याची क्षमता आहे.
हे ड्रोन ताशी 370 किलोमीटर वेगाने उड्डाण करतात. याशिवाय हे ड्रोन 40 किलोमीटरपर्यंतची स्फोटके वाहबन नेण्यास सक्षम आहे. आकाशात 3000 मीटर उंचीवर उडण्याची या ड्रोनमध्ये क्षमता आहे. इस्त्रायली संरक्षण दलाने या आत्मघाती ड्रोनचा पाठलाग केला तेव्हा ते काही वेळातच रडावरून गायब झाल्याचे त्यांनी सांगितले. IDF ने म्हटले आहे की, हे ड्रोन जमिनिच्या गदी जवळून उड्डाण करत होते. यामुळे हवाई यंत्रणेलाही त्याला पकडण्यात यश मिळाले नाही.
हे देखील वाचा- चीन तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत; लष्करी हालचालींमुळे वाढले तणाव