Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीषण अपघात! ब्राझीलमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसला ट्रकची धडक; 38 जणांचा मृत्यू

दक्षिण-पूर्व ब्राझीलमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. मिळालेय् माहितीनुसार, रस्ते अपघातात एका ट्रकने प्रवाशांनी भरलेल्या बसला जोरदार धडक दिली. यामध्ये 38 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 22, 2024 | 12:39 PM
भीषण अपघात! ब्राझीलमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसला ट्रकची धडक; 38 जणांचा मृत्यू

भीषण अपघात! ब्राझीलमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसला ट्रकची धडक; 38 जणांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: दक्षिण-पूर्व ब्राझीलमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. मिळालेय् माहितीनुसार, रस्ते अपघातात एका ट्रकने प्रवाशांनी भरलेल्या बसला जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिस कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले होते. यामध्ये 38 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. तर 13 जण जखमी असून त्यांना टियाफिलो ओटानी शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बसचा टायर फुटल्याने बस अनियंत्रित

मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये सुमारे 45 प्रवासी प्रवास करत होते. बस साओ पाउलो येथून निघाली होती. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बसचा टायर फुटल्यामुळे बस अनियंत्रित झाली आणि ती थेट ट्रकवर आदळली. या अपघातात एका कारलाही धक्का बसला, परंतु सुदैवाने त्या कारमधील तीन प्रवाशांचे प्राण वाचले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अल-जुलानी यांच्यापासून आता धोका नाही; अमेरिकेन सरकारने दहशतवादी लिस्टमधून हटवले

ब्राझील राष्ट्रपतींनी दुःख व्यक्त केले

ब्राझीलच्या राष्ट्रपती लुइज इनासियो लुला दा सिल्वा यांनी या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करताना म्हटले की, “माझ्या मनाला खूप दुःख झाले आहे. या भीषण अपघातात मरण पावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांसाठी मी प्रार्थना करतो.” ब्राझीलच्या परिवहन मंत्रालयाच्या अहवालानुसार, यावर्षी देशभरात रस्ते अपघातांमध्ये 10,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर चिंतेची बाब आहे.

ब्राझीलमध्ये वाढते अपघात

या अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी तत्काळ बचावकार्य सुरू केले. अग्निशमन विभागाने सांगितले की, अपघाताचा परिणाम इतका भयानक होता की, मृतदेह बाहेर काढण्यासाठी आणि जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी अनेक तास लागले. रस्ते अपघातांमध्ये वाढती मृत्यू संख्या ब्राझीलसाठी एक मोठे आव्हान आहे. अपघातांची कारणे शोधणे आणि त्यावर उपाययोजना करणे प्रशासनासाठी अत्यावश्यक बनले आहे.

वाहतूक व्यवस्थापन आणि रस्त्यांची सुरक्षितता सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली जाणे गरजेचे आहे. या घटनेने संपूर्ण ब्राझीलमध्ये शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांसाठी हा अपघात एक अमूल्य हानी असून, संपूर्ण देश त्यांच्या दुःखात सहभागी आहे. प्रशासनाने अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युनूस सरकार संभ्रमात! शेख हसीनानंतर भारतावर लोकांना ‘गायब’ केल्याचा बांगलादेशचा आरोप

Web Title: Horrific accident truck hits bus full of passengers in brazil 38 dead nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 12:39 PM

Topics:  

  • Brazil
  • Bus Accident
  • World news

संबंधित बातम्या

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
1

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही
2

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…
3

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…

Iran visa ban : इराणचा मोठा निर्णय! भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्रीवर घातली बंदी, कारण काय?
4

Iran visa ban : इराणचा मोठा निर्णय! भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्रीवर घातली बंदी, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.