
या हॉटेलमध्ये आहे फ्रीमध्ये राहण्याची,खाण्यापिण्याची सोय तुम्हाला फक्त 'ही' अट पूर्ण करावी लागेल
टोकियो : जगभरातील बहुतेक लोकांना प्रवास करणे आणि खाणे पिणे आवडते. पण प्रवास आणि खाण्यात सगळ्यात मोठी अडचण असते ती पैशाची. अनेक वेळा कमी बजेटमुळे माणसाला त्याच्या आवडीचे पदार्थ खाणे शक्य होत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की असे एक हॉटेल आहे जे लोकांना मोफत जेवण देते. आज आम्ही तुम्हाला अशा हॉटेलबद्दल सांगणार आहोत जिथे जेवण मोफत मिळते. पण मोफत जेवण मिळण्यासाठी हॉटेल मालकाने एक अट घातली आहे जी पूर्ण करावी लागेल. म्हणूनच जाणून घ्या कोणते आहे ते हॉटेल आणि कोठे आहे हे ठिकाण?
हॉटेल
भारतासह जगभरातील इतर देशांमध्ये खाण्यापिण्याचे शौकीन अनेक लोक आहेत. खाद्यप्रेमी चांगल्या अन्नाच्या शोधात मैलांचा प्रवास करतात. पण सामान्य माणूस रोज चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवू शकत नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ खूप महाग आहेत, जे सामान्य माणूस दररोज खाऊ शकत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा रेस्टॉरंटबद्दल सांगणार आहोत जिथे लोकांना मोफत जेवण मिळते.
हे हॉटेल कुठे आहे
जपानमधील एक रेस्टॉरंट अशाच एका अनोख्या स्टाईलमध्ये समोर आले आहे. इथल्या मोफत जेवणाची कल्पना लोकांमध्ये नेहमीच चर्चेत असते. या रेस्टॉरंटचे नाव मिराई शिकोडू आहे जे टोकियोमध्ये आहे. मिराई शिकोडू म्हणजे भविष्यातील रेस्टॉरंट. येथे अन्न खाण्यासाठी 50 मिनिटांची शिफ्ट करावी लागते. आतापर्यंत शेकडोहून अधिक लोक येथे कामासाठी आले आहेत. या लोकांनी आपापल्या कामाचा वाटाही निवडला आहे. त्या बदल्यात त्यांना त्यांचे आवडते पदार्थ खायला मिळतात.
फोटो सौजन्य : सोशल मीडिया
कर्मचारी काय म्हणतात?
येथील शेफ सेगाई कोब्याची सांगतात की चांगले अन्न हा प्रत्येकाचा हक्क आहे. पैशांची कमतरता म्हणजे अन्नाची कमतरता आहे असे नाही, असे त्यांचे मत आहे. सर्वांचे स्वागत होईल अशी जागा निर्माण करणे हे त्यांच्या प्रयोगामागचे कारण होते. त्यांनी सांगितले की अनेक विद्यार्थी पैसे वाचवण्यासाठी येथे येतात आणि त्यांना चांगले जेवण मिळते.
लोक शिफ्टमध्ये काम करतात
या हॉटेलमध्ये लोक शिफ्टमध्ये काम करतात. ज्यामध्ये भांडी अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवली जातात. हे काम पूर्ण झाल्यावर, ग्राहकांना त्यांची आवडती डिश तात्काळ मिळू शकते, तीही मोफत. ते इतर भुकेल्या ग्राहकांना देणगी देण्यासाठी जेवणाची तिकिटे देखील गोळा करू शकतात.