Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या नसताना गर्भधारणेपासून स्वत:ला कशा वाचवायच्या त्या स्त्रिया ? सुल्तान सुलेमानच्या राज्यात चालायचं तरी काय ?

सुलेमान यांच्या हरममध्ये अनेक ठेवलेल्या बायका होत्या. मात्र त्यांच्या गरोदर होण्यावर बंदी होती. राजाच्या इच्छेव्यतिरिक्त कोणत्याही ठेवलेल्या बाईला (concubine) गर्भधारणेची (Pregnancy) परवानगी नव्हती.

  • By साधना
Updated On: Feb 24, 2023 | 12:11 PM
कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या नसताना गर्भधारणेपासून स्वत:ला कशा वाचवायच्या त्या स्त्रिया ? सुल्तान सुलेमानच्या राज्यात चालायचं तरी काय ?
Follow Us
Follow Us:

मुघल साम्राज्याच्या व्यतिरिक्त इतिहासात ओटोमन साम्राज्याचाही(Ottoman Empire) उल्लेख नेहमी केला जातो. या साम्राज्याचे 10वे राजे सुल्तान सुलेमान (Sultan suleman) होते. त्यांच्या नावावर ओटोमन शासक म्हणून दिर्घकाळ काम केल्याचा रेकॉर्ड आहे. सुलेमान 1520 मध्ये आपल्या वडिलांच्या निधनानंतर राजा झाले. पुढे 1566ला त्यांचं निधन होईपर्यंत ते राजेच होते.

सगळ्यात जास्त काळ राज्य करण्यासोबतच हरममुळेही त्याला ओळखलं जातं. असं म्हटलं जातं की, सुलेमान यांच्या हरममध्ये अनेक ठेवलेल्या बायका होत्या. मात्र त्यांच्या गरोदर होण्यावर बंदी होती. राजाच्या इच्छेव्यतिरिक्त कोणत्याही ठेवलेल्या बाईला (concubine) गर्भधारणेची (Pregnancy) परवानगी नव्हती. त्या काळात गर्भनिरोधक गोळ्या किंवा कंडोम काहीही नव्हतं. त्यामुळे राजाचा आदेश पाळण्यासाठी आणि प्रेग्नंन्सी राहू नये म्हणून दाश्यांना अनेक प्रयत्न करावे लागत.

कडक होते नियम
सुल्तानचे हरमचे नियम खूप कडक होते. सुल्तानला सांगितल्याशिवाय त्याच्या ठेवलेल्या कोणत्याही बाईला गर्भ ठे‌वण्यास मनाई होती. त्यामुळे या बायका स्वत:च काहीतरी उपाय शोधायच्या. ज्या बायकांना हरममध्ये आणलं जायचं त्यांच्यावर कायम लक्ष ठेवलं जायचं. त्यामुळे बायका जुन्या पद्धती वापरून गर्भधारणा होऊ नये यासाठी प्रयत्न करत. हे प्रकार खरंतर रानटी किंवा जंगली असल्याचं म्हटलं जातं. अनेकवेळा हे प्रकार बायकांच्या जीवावरदेखील बेतायचे.

अ‍ॅसिडचा वापर
त्या काळात मिरामिस्टिन आणि क्लोरहेक्सिडिन ( शारिरिक स्वच्छतेसाठी वापरले जाणारे पदार्थ) नव्हते. त्यामुळे हरममधल्या महिलांना व्हजायनाच्या स्वच्छतेसाठी अ‍ॅसिडचा वापर करायला लागायचा. महिला लिंबू, संत्री, डाळिंब यासोबत व्हिनेगरचा वापर करायच्या. या अ‍ॅसिडचा उपयोग स्पर्ममधले शुक्राणू मारण्यासाठी व्हायचा.

काढ्याचा उपयोग
याशिवाय काही औषधी वनस्पतींचे काढे महिला घ्यायच्या. अनेक पिढ्या हे असंच सुरु होतं. म्हातारी दासी नव्या दासीला हे प्रकार सांगायची. यात वर्मवुड, पुदीना, क्रोकस, हॉर्सटेल याच्या काढ्याचा समावेश होता. जेणेकरून गर्भधारणा झाली असेल तरी गर्भपात व्हावा.

हरममध्ये जाण्याआधीची तयारी
हरममध्ये जाण्याआधी दासीला कळवलं जायचं. जेणेकरून ती सजून तयार होऊ शकेल. हरममध्ये जायच्या तयारीमध्ये स्वत:ला गर्भधारणेपासून वाचवणं हादेखील एक भाग होता. नैसर्गिक तेलांचा वापरही त्या काळात केला जायचा. तेल वापरून शारिरीक संबंधांमुळे होणाऱ्या रोगांवर इलाज व्हायचा. यात ऑलिव्ह आणि देवदारच्या तेलाचा समावेश होता.

राजासोबत रात्र घालवल्यानंतरही उपाय
सुल्तानच्या हरममध्ये रात्र घालवल्यानंतर दासी सुरक्षेच्या पुढच्या टप्प्याची तयारी करायची. ती फ्लॉवर किंवा डाळिंबाच्या रसात बुडवलेला कपडा व्हजायनाच्या आत ठेवायची. जेणेकरून शुक्राणूंचा परिणाम होऊ नये. राजाला त्याच्या ठेवलेल्या बायकांची मुलं नको होती कारण हजारो उत्तराधिकारी निर्माण झाले असते आणि ते त्याच्यासाठी हानिकारक ठरलं असतं.

Web Title: How women in sultan sulemans empire saved them from pregnancy nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2023 | 12:03 PM

Topics:  

  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल
1

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी
2

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी
3

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?
4

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.