Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी

Vijay Singh: विजय सिंह हे अनेक वर्षापासून टाटा ट्रस्टशी जोडलेले आहेत. संस्थेच्या विविध कामांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, अलीकडच्या काळात ट्रस्टमध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 21, 2026 | 01:34 PM
Vijay Singh (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Vijay Singh (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

देशातील सर्वात प्रतिष्ठात संस्थांपैकी एक असलेल्या टाटा ट्रस्टमध्ये पुन्हा एकदा महत्त्वाची घडामोड घडली आहे. ट्रस्टमध्ये उपाध्यक्ष विजय सिंह Vijay Singh  यांनी सर रतन टाटा ट्रस्टच्या विश्वस्तपदावरुन बाजूला होण्याचा निर्णया घेतला आहे. 14 ऑगस्ट रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार असून त्यानंतर ते या पदावर पुढे काम करणाक नाहीत. त्यांच्य या निर्णयामुळे उद्योग क्षेत्रात आणि कॉर्पोरेट वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

विविध कामांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका

विजय सिंह हे अनेक वर्षापासून टाटा ट्रस्टशी जोडलेले आहेत. संस्थेच्या विविध कामांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, अलीकडच्या काळात ट्रस्टमध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, मात्र अलीकडच्या काळात ट्रस्टमध्ये सुरु असलेल्या घडामोडींमुळे त्यांनी पुढील कार्यकाळ स्वीकारु नये. असा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, ते सर दोराबाजी टाटा ट्रस्टमध्ये आणखी एक वर्ष म्हणून काम करत राहणार आहेत.

महत्त्वाच्या निर्णयांवर मतभेद

विश्वस्तपद सोडण्यामागे केवळ वैयक्तिक कारण नसून, ट्रस्टमधील बदलेले वातावरणही कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. रतनटाटा यांच्या निधनानंतर संस्थेतील परिस्थितीत मोठे बदल झाले. काही महत्त्वाच्या निर्णयांवर मतभेद वाढल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर विजय सिंह यांनी पुढे या जबाबदारीत राहू नये, असा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

वेगवेगळ्या मतांचे पडसाद

गेल्या काही महिन्यांपासून टाटा ट्रस्ट अनेक कारणांनी चर्चेत आहे. काही अंतर्गत निर्णयांवर वेगवेगळ्या मतांचे पडसाद उमटले. त्याचबरोबर काही बाबींवर नियामक यंत्रणांकडूनही लक्ष ठेवले जात असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे संस्थेच्या कामकाजावरही त्याचा परिणाम झाल्याचे मानले जाते.

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?

पुढील नियुक्त्यांवरही परिणाम

मे महिन्यातही विजय सिंह यांनी आणखी एक ट्रस्टमधील जबाबदारीचा राजीनामा दिला होता. त्यावेळी विश्वस्तांच्या नियुक्तीबाबत वाद निर्माण झाला होता. काही सदस्यांनी त्यांच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित केले होते. जुन्या नियमांचा आधार घेता काही आक्षेप नोंदवण्यात आले होते. या वादामुळे पुढील नियुक्त्यांवरही परिणाम झाला. आ

प्रशासनाशी संबंधित अनेक विषय

दरम्यान, टाटा ट्र्स्टच्या काही बैठका सध्या होऊ शकलेल्या नाहीत. काही तक्रारींच्या सुनावणी सुरु असलेल्या संबंधित प्रकरण निकाली निघेपर्यंत महत्त्वाचे निर्णया पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन नियुक्ता आणि प्रशासनाशी संबंधित अनेक विषय प्रलंबिता राहिले आहेत.

पुढील काळात मोठे निर्णय

टाटा ट्रस्टकडे टाटा सन्समधील मोठा हिस्सा असल्याने या संस्थेतील प्रत्येक निर्णयाला विशेष महत्त्व असते. भविष्यात संचालक मंडळावर कोणाचे प्रतिनिधित्व राहणार, याकडेही उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे. याच विषयावर पुढील काळात मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विजय सिंह यांच्या काही सार्वजनिक विधानांचीही त्या काळात चर्चा झाली होती. विशेषतः टाटा सन्सच्या भविष्यातील धोरणाबाबत त्यांनी मांडलेली भूमिका काही सदस्यांच्या मतांपेक्षा वेगळी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या पुढील नियुक्तीबाबत एकमत होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा कॉर्पोरेट वर्तुळात सुरू होती.

SEBI ने CDSL वर लावला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड! सायबर सिक्युरिटीची चूक पडली भारी; तपासणीत सत्य आले बाहेर

प्रत्येक निर्णयाचा परिणाम

आता 14 ऑगस्टनंतर सर रतन टाटा ट्रस्टमध्ये नवीन विश्वस्ताची नियुक्ती होते का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. टाटा समूहाशी संबंधित प्रत्येक निर्णयाचा परिणाम केवळ संस्थेपुरता मर्यादित राहत नाही, तर उद्योगविश्वातही त्याची चर्चा होते. त्यामुळे विजय सिंह यांच्या निर्णयानंतर ट्रस्टच्या पुढील वाटचालीबाबत उत्सुकता वाढली आहे.

एकूणच, हा निर्णय केवळ एका पदाचा राजीनामा नसून, टाटा ट्रस्टमधील बदलत्या घडामोडींचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पुढील काही महिन्यांत या संस्थेतील प्रशासन, नेतृत्व आणि भविष्यातील धोरणांबाबत कोणते निर्णय घेतले जातात, यावर अनेकांचे लक्ष राहणार आहे.

 

Web Title: Vijay singh to step down from tata trusts in august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Tata Trust

संबंधित बातम्या

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी
1

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?
2

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?

SEBI ने CDSL वर लावला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड! सायबर सिक्युरिटीची चूक पडली भारी; तपासणीत सत्य आले बाहेर
3

SEBI ने CDSL वर लावला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड! सायबर सिक्युरिटीची चूक पडली भारी; तपासणीत सत्य आले बाहेर

Credit Card Limit: पगारापेक्षा जास्त का असते क्रेडिट कार्डची लिमिट? बँकांचा ‘हा’ गेम प्लॅन समजून घ्या
4

Credit Card Limit: पगारापेक्षा जास्त का असते क्रेडिट कार्डची लिमिट? बँकांचा ‘हा’ गेम प्लॅन समजून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.