
Boat Capsize in Malaysia
Malyasia Boat Collapse news in Marathi : क्वालालंपूर : मलेशियाच्या (Malaysia) सीमेजवळ हिंद महासागरात एक भीषण दुर्घटना होती. म्यानमारच्या सुमारे ३०० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली आहे. (Boat Accident) यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (०९ नोव्हेंबर) या घटनेची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव अधिकाऱ्यांनी तातडीने धाव गेतली. या दुर्घटनेत केवळ १० जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर एकाचा मृतदेह सापडला आहे. बाकीचे लोक अद्यापही बेपत्ता आहे. बचाव अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती उशिरा मिळाल्याने शेकडो लोक बेपत्ता झाला आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बेपत्ता लोकांचा शोध घेणे सुरु आहे. बोट उलटण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु अधिकार्यांच्या तीव्र लाटांमुळे हा अपघात घडला असण्याची शक्यात आहे. तसेच दुर्घटनेचे नेमकं ठिकाणी अद्याप कळालेले नाही. थायलंडच्या सागरी भागात ही घटना घडली असल्याचे काहींनी म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमापार जाणाऱ्यांना धोक्याचा इशारा माहित असताना देखील लोक समुद्री मार्गे स्थलांतर करत आहे.
वाचवण्यात आलेल्यांमध्ये रोहिंग्या मुस्लिमांचा समावेश आहे. या जमातीचे लोक म्यानमारमध्ये राहतात. म्यानमारमध्ये या लोकांना गेल्या अनेक दशकांपासून छळ सहन करावा लागत आहे. मलेशियाच्या मेरीटाइम एन्फोर्समेंट एजन्सीचे फर्स्ट अडमिरल रोमली मुस्तफा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट म्यानमारच्या राखीन येथील बुथिडाउंग शहरातून रावाना झाली होती. तीन दिवसांपूर्वीच ही बोट बुडाली होती.
ज्या लोकांना पोहता येते होते त्यांनी मलेशियाच्या उत्तरेकडी रिसॉर्ट बेट लॅंगकावीजवळी धाव घेतली. यावेळी बचाव अधिकाऱ्यांना शनिवारी (०८ नोव्हेंबर) रोजी ही माहिती मिळाली. यानंतर तातडीने बचाव कार्य आणि बेपत्ता लोकांचा शोध सुरु झाला. घटनास्थळावरुन केवळ १० जणांना वाचवण्यात यश आले. या दुर्घटनेत बहुतांश बांगलादेश आणि म्यानमारचे रहिवासी होती.
यापूर्वी आफ्रिकन देश मोझांबिकमध्ये देखील अशीच घटना घडली आहे. भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बोट अचानक कोसळली होती. १८ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. आफ्रिकन देशात बोट दुर्घटनेचा घटना आता सामान्य झाल्या आहे. लोक सीमापार जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे. लोक धोकादायक सागरी मार्गाने प्रवास करत आहे. चांगल्या भविष्याच्या शोधात जीव गमावून बसत आहे. या घयटनेने बेकायदेशीर स्थलांरितांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
Explainer : पाक-अफगाण तणाव शिगेला! दोन्ही देशांची एकमेकांना युद्धाची उघड धमकी, कोण जिंकेल?
Ans: थायलंड आणि मलेशियाच्या किनाऱ्याजवळ हिंद महासागरात बोट उलटली आहे.
Ans: मलेशियातील दुर्घटनेत केवळ १०० जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर १ मृतदेह सापडला आहे. बाकी २८९ लोक अद्यापही बेपत्ता आहेत.
Ans: मलेशियातील बोटीत क्रू मेंमबर्ससह ३०० प्रवाशांचा समावेश होता.