Pak-Afghan War : पाक-अफगाण तणाव शिगेला! दोन्ही देशांची एकमेकांना युद्धाची उघड धमकी, कोण जिंकेल? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pak-Afghan War : इस्लामाबाद/ काबूल : पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमधील (Afghanistan) तणाव आता शिगेला पोहोचला आहे. तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये झालेली तिसरी शांतता चर्चा देखील अयशस्वी ठरली आहे. यामुळे दोन्ही देशात तीव्र संघर्ष सुरु होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नुकतेच तालिबानने पाकिस्तानवर शांतता चर्चेत अडथळा आणल्याचे आरोप करत युद्धाची धमकी दिली होती, तर पाकिस्तानचे असीम मुनीर यांनी देखील याला खुले आव्हान दिले आहे.
गेल्या महिन्यात ड्युरंड रेषेवर दोन्ही देशात चकामक झाली होती. यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केल्याचा आरोप केला. यामुळे दोन्ही देशांतील शांत झालेला तणाव पुन्हा उफाळला. यापूर्वी २०२१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते. यावेळी पाकिस्तानने अमेरिकेला साथ दिली. तेव्हापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव होता. यामुळे अनेकदा दोन्ही देशांत ड्युरंड रेषेवर सतत संघर्षही होत असतो. परंतु यावेळी हा तणाव अधिक वाढला आहे.
सध्याची परिस्थिती पाहता युद्ध छिडण्याची शक्यता आहे. यामुळे युद्ध सुरु झाल्यास कोण जिंकेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन्ही देशांची लष्करी ताकद पाहिली तर पाकिस्तान तालिबानपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. पाकिस्तानकडे आधुनिक शस्त्रे, हवाई दल, आणि अण्वस्त्र देखील आहे. परंतु काही तज्ज्ञांच्या मेत, दोन्ही देशातील दीर्घकाली संघर्ष पाहिला तर यामुळे पाकिस्तानला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
धार्मिक आव्हान
या युद्धात पाकिस्तानसमोर दोन सर्वात मोठी आव्हाने आहेत ती म्हणजे एक धार्मिक आणि राजकीय वैधतेचा अभाव. तालिबान स्वत:ला इस्लामाचा खरा रक्षक मानतो, तर पाकिस्तान खोट्या इस्लामिक प्रचार करतो असा आरोप आहे. तसेच पाकिस्तानने आतापर्यंत तालिबानसोबच्या युद्धांना धार्मिक रुप देण्याचा प्रयत्न केला आहे आणि अजनूही तोच मार्ग अवलंबवण्याची शक्यता आहे. परंतु यावेळी त्यांच्यासमोर स्वत:ला इस्लामचा खरा रक्षक मानणारा तालिबान उभा आहे, यामुळे या युद्धाला धार्मिक वळण देणे पाकिस्तानला कठीण ठरण्याची शक्यता आहे.
राजकीय आव्हान
पाकिस्तानची राजकीय परिस्थितीत देखील अत्यंत कमी आहे. गेल्या अनेक काळापासून पाकिस्तानची सत्ता लष्कराच्या हाती असल्याचे सांगितले जाते. सध्या पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पीटीआय, अवामी नॅशनल पार्टी
आणि पख्तूनख्वां मिल्ली अवामी पार्टी हे पक्ष आहेत.
या पक्षांनी अफगाणिस्तान विरुद्ध युद्धाला नकार दिला आहे. दुसरीकडे अंतर्गत संघर्षामुळे खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानचे नागरिक अफगाण लोकांशी सामाजिक आणि व्यापारामुळे जोडले गेलेल आहेत. यामुळे स्थानिक लोकांचा पाठिंबा पाकिस्तान शहबाज सरकार किंवा लष्कराला मिळणे अशक्य आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानची राजकीय ताकद अधिक मजबूत आहे.
आणखी काही आव्हाने
यामुळे पाकिस्तानकडे शक्तिशाली सेना असली तर तालिबानसोबतच्या युद्धात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला, सामाजिक एकतेला आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो. केवळ संवादाच्या मार्गानेच दोन्ही देशातील तणाव कमी होण्याची शक्यात आहे.
Pakistan संपणार! ‘हा’ देश करणार भयानक हल्ला? ISI सह सरकारची उडाली झोप






