हरदीप सिंग निज्जर हत्याकांड पुन्हा चर्चेत! ब्रिटिश गुप्तचरांचा भारताशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Hardeep Singh Nijjar Case Update Marathi : ओटावा : हरदीप सिंग निज्जर हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायत खुलासा करण्यात आला आहे. पण यामुळे भारत आणि कॅनडामध्ये संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.
India Canada Relations : एस. जयशंकर पुढील आठवड्यात कॅनडा दौऱ्यावर ; भारताशी संबंधाना मिळणार नवी दिशा
ब्लूमबर्गच्या ओरिजिनल्सच्या डॉक्युमेंटरीनुसार, ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांना काही संवादाच्या इंटरसेप्ट कॅनडा सरकारला दिल्या आहे. यामध्ये भारत आणि खलिस्तानी नेत्या हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या संभाव्या शोधांबाबत माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारत-कॅनडातील गुंतागुंतीचे संबंध सुधारण्याच्या मार्गावर असताना पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे.
डॉक्युमेंटरीनुसार, ब्रिटनची इलेक्ट्रॉनिक गुप्तचर संस्था गव्हर्नमेंट कम्युनिकेशन्स हेडक्वार्टर्स (GCHQ) ने काही गुप्त कॉल्स इंटरसेप्ट केल्या आहे. यामध्ये तीन महत्त्वाचे संभाव्य टार्गेट्स आहे. हरदीप सिंग निज्जर, अवतार सिंग खंडा आणि गुरपतवंत सिंग पन्नू यांच्याबद्दल चर्चा करण्यात आली आहे. ही माहिती Five Eyes अलायन्स देशांमध्ये म्हणजेच ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये शेअर करण्यात आली आहे. २०२३ मध्ये ही माहिती इतर चार देशांनी कॅनडाला दिली होती.
या अहवालानुसार, ही गुप्त माहिती कठोर अटींवर कॅनडाला प्रत्यक्षात सोपवण्यात आली होती. ही माहिती कोणत्या इलेक्ट्रॉनिक नेटवर्कवरुन ने पाठवता थेट हरदीप सिंग निज्जर हत्येप्रकरणी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली होती. या इंटरसेप्टमध्ये भारत सरकारसाठी काम करणाऱ्या चार व्यक्तींनी निज्जरला संपवले असल्याची चर्चा केल्याचा दावा करण्यात आला आहे.
या आरोपानंतर ब्रिटनने या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु केली आहे. सिख फेडरेशन यूकेने ब्रिटिश सुरक्षा मंत्री डॅन जार्विस यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये सिख समुदायाच्या खासदारांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी एवढी मोठी माहिती का
लपवली असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे भारताने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. भारताने हे आरोप निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे स्पष्ट केले आहे. कॅनडावर खलिस्तानींना आश्रय दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे भारत आणि कॅनडा संबंधामध्ये तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.
काय आहे निज्जर हत्याकांड?
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची 18 जून 2023 रोजी कॅनडातील सरे येथे एका गुरुद्वाराबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली. भारतात वॉन्टेड असलेल्या निज्जरवर 12 पेक्षा जास्त हत्या आणि दहशतवादी कृत्यांशी संबंधित गुन्हे दाखल होते. 1997 मध्ये तो कॅनडात पळून गेला. त्यानंतरही कॅनडा सरकारने त्याच्यावर कारवाई केली नाही. या हत्येनंतर भारत-कॅनडा संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला.






