Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२७ वर्षांपूर्वी सोडला भारत, २०२२ मध्ये झाली वापसी… ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्यात ‘हैदराबाद कनेक्शन’ उघड!

Sajid Akram Hyderabad Origin: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील बोंडी बीचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. वृत्तानुसार, दहशतवादी साजिद अक्रम हा भारतातील हैदराबादचा रहिवासी होता.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 16, 2025 | 07:54 PM
ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्यात 'हैदराबाद कनेक्शन' उघड! (Photo Credit - X)

ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्यात 'हैदराबाद कनेक्शन' उघड! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • ऑस्ट्रेलियातील बॉम्बे बीच हल्ल्याचे ‘हैदराबाद कनेक्शन’ उघड!
  • मुख्य आरोपी साजिद अक्रम मूळचा भारतीय
  • ISIS च्या संघटनेशी जोडल्याच्या संशयाने खळबळ
Sydney Bondi Beach Attack: १४ डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील बोंडी बीचवर (Bondi Beach) झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यामुळे तपास यंत्रणा हादरल्या आहेत. ज्यू समुदायाला लक्ष्य करून झालेल्या या हल्ल्यात १५ जण ठार झाले, तर ४० हून अधिक जण जखमी झाले. यात हल्ल्यात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याचाही मृत्यू झाला होता.

हल्लेखोर साजिद अक्रम मूळचा हैदराबादी

तपास यंत्रणांनी दिलेल्या महत्त्वाच्या माहितीनुसार, या हल्ल्यातील मुख्य आरोपी साजिद अक्रम हा मूळचा भारताच्या हैदराबाद येथील रहिवासी होता. त्याने १९९८ मध्ये भारत सोडला आणि तेव्हापासून तो ऑस्ट्रेलियात राहत होता. त्याने शेवटचा २०२२ मध्ये भारत दौरा केला होता. यापूर्वी अनेक माध्यमांनी हल्लेखोराला पाकिस्तानी नागरिक म्हणून ओळखले होते, परंतु आता त्याची भारतीय पार्श्वभूमी निश्चित झाली आहे.

२७ वर्षांत फक्त सहा वेळा भारत भेट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या २७ वर्षांत साजिदचा हैदराबादमधील त्याच्या नातेवाईकांशी फार कमी संपर्क होता. तो मालमत्ता किंवा कौटुंबिक बाबींसाठी फक्त सहा वेळा भारतात आला होता. वडिलांच्या मृत्यूसाठीही त्याला भारतात येणे महत्त्वाचे वाटले नाही. हैदराबादमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्याला त्याच्या कट्टरपंथी विचारसरणीबद्दल किंवा कारवायांबद्दल काहीही माहिती नव्हती. तेलंगणा पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, १९९८ मध्ये देश सोडण्यापूर्वी साजिद अक्रमचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता. पोलिसांचा असा विश्वास आहे की, साजिद आणि त्याच्या मुलाचे कट्टरपंथी होणे हे भारत किंवा तेलंगणातील स्थानिक प्रभावाचे परिणाम नाही.

हे देखील वाचा: Bondi Beach Shooting: बोंडी दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे थेट भारतापर्यंत; ‘अशा’ कुटील कारवाईमुळे सुरक्षा यंत्रणांच्या झोपा उडाल्या

हल्ल्याची योजना फिलीपिन्समध्ये?

CNN च्या वृत्तानुसार साजिद अक्रम १ नोव्हेंबर रोजी त्याचा मुलगा नवीदसोबत फिलीपिन्सला गेला होता. साजिदने भारतीय पासपोर्ट वापरला, तर मुलाने (नवीद) ऑस्ट्रेलियन पासपोर्टवर प्रवास केला. दहशतवादी वडील आणि मुलाने सुमारे एक महिना दक्षिण फिलीपिन्समधील दावाओ शहरात राहून हल्ल्याची योजना आखली. हा परिसर इस्लामिक अतिरेकी संघटनांचा बालेकिल्ला मानला जातो.

ISIS कनेक्शनचा संशय

तपास यंत्रणांना दहशतवाद्यांच्या गाडीतून दोन आयसिसचे झेंडे (ISIS flags) जप्त झाले आहेत. यामुळे हल्लेखोर आयसिसशी संबंधित असल्याचा संशय आणखी वाढला आहे. ऑस्ट्रेलियन सुरक्षा संस्था या दहशतवादी नेटवर्कच्या आंतरराष्ट्रीय संबंधांची सखोल चौकशी करत आहेत. या हल्ल्यात तीन भारतीय विद्यार्थीही जखमी झाले असून, त्यापैकी किमान दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पंतप्रधानांचा निषेध

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. हल्लेखोरांची विचारसरणी इस्लामिक स्टेटसारख्या दहशतवादी विचारसरणीने प्रभावित होती. ‘इस्लामची कट्टरपंथी आणि हिंसक व्याख्या हे गंभीर जागतिक आव्हान बनले आहे आणि त्याला कठोरपणे तोंड द्यावे लागेल,’ असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा: ‘तू ऑस्ट्रेलियाचा हिरो’ ; बोडीं बीच हल्ल्यात दहशतवाद्याची रायफल हिसकावणाऱ्या अहमदची PM अल्बानीज यांनी घेतली भेट

Web Title: Hyderabad connection revealed in the terrorist attack in australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 07:54 PM

Topics:  

  • Australia
  • Firing News
  • Hyderabad

संबंधित बातम्या

Bondi Beach Shooting: बोंडी दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे थेट भारतापर्यंत; ‘अशा’ कुटील कारवाईमुळे सुरक्षा यंत्रणांच्या झोपा उडाल्या
1

Bondi Beach Shooting: बोंडी दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे थेट भारतापर्यंत; ‘अशा’ कुटील कारवाईमुळे सुरक्षा यंत्रणांच्या झोपा उडाल्या

‘तू ऑस्ट्रेलियाचा हिरो’ ; बोडीं बीच हल्ल्यात दहशतवाद्याची रायफल हिसकावणाऱ्या अहमदची PM अल्बानीज यांनी घेतली भेट
2

‘तू ऑस्ट्रेलियाचा हिरो’ ; बोडीं बीच हल्ल्यात दहशतवाद्याची रायफल हिसकावणाऱ्या अहमदची PM अल्बानीज यांनी घेतली भेट

सिडनी हल्ल्याचा मुंबई २६/११शी संबंध? दहशतवाद्यांनी ‘या’ खास व्यक्तीला केले टार्गेट
3

सिडनी हल्ल्याचा मुंबई २६/११शी संबंध? दहशतवाद्यांनी ‘या’ खास व्यक्तीला केले टार्गेट

यहूदींवरील हल्ल्यानंतर बेंजामिन नेतन्याहूंची संतप्त प्रतिक्रिया ; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप
4

यहूदींवरील हल्ल्यानंतर बेंजामिन नेतन्याहूंची संतप्त प्रतिक्रिया ; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.