'तू ऑस्ट्रेलियाचा हिरो' ; बोडीं बीच हल्ल्यात दहशतवाद्याची रायफल हिसकावणाऱ्या अहमदची PM अल्बानीज यांनी घेतली भेट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बंदूक हिसकावून घेताना अहमदला दोन गोळ्या लागल्या होत्या. यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्या त्याची प्रकृती स्थिर आहे. परंतु अहमदच्या या धाडलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलियाचा हिरो म्हणून त्याला संबोधले जात आहे. अहमदने आपल्या जीवाचा कोणतीही पर्वा न करत दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेतली ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. यावर पंतप्रधान अल्बानीज यांनी, अहमदचे कौतुक करत म्हटले की, “अहमद तू इतरांना वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातलास. तू दहशतवाद्याशी निशस्त्र लढा दिलास तू खरा ऑस्ट्रेलियन हिरो आहेस.”
याशिवाय पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सोशल मीडियावर अहमदचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले की, ऑस्ट्रेलियन लोकांची ओळख अशा संकटाच्या काळात बाहेर येते. रविवारी रात्री नेमकं हेच घडले, अहमदने आपल्या जीवाची पर्वा न करता दहशवाद्याची बंदुक हिसकानू घेतली. त्याच्या या धाडसामुळे अनेकांचे प्राण वाचले. मी अहमदचे ऑस्ट्रेलियाच्या वतीने आभार मानतो.
सध्या या घटनेनंतर ऑस्ट्रेलियात भीतीचे वातावर आहे. हल्लेखोर दोन पाकिस्तानी नागरिक असून साजिद अक्रम आणि त्याचा मुलगा नवीद अक्रम अशी यांची ओळख पटवण्यात आली आहे. साजिद अक्रमचा चकामकीत मृत्यू झाला आहे. तर २४ वर्षी नवीद जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल आहे. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाच्या सरकारने बंदूक परवाना कायदे अधिक कडक केले आहेत. या हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र निषेध केला जात आहे.
Ahmed, thank you on behalf of every Australian. pic.twitter.com/H7RXr5o9sc — Anthony Albanese (@AlboMP) December 16, 2025
सिडनी हल्ल्याचा मुंबई २६/११शी संबंध? दहशतवाद्यांनी ‘या’ खास व्यक्तीला केले टार्गेट






