ट्रम्पच्या विजयानंतर गर्भनिरोधक औषधांच्या मागणीत वाढ; महिलांना गर्भपाताचे अधिकार काढून घेण्याची भिती
वॉश्गिंटन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. यांनंतर त्यांच्या विजयाला अमेरिकेतील अनेक महिलंनी विरोध दर्शवत महिलांनी गर्भपाताच्या अधिकारासाठी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाचे उद्दिष्ट महिलांना गर्भपाताचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत ते पुरुषांशी संबंध ठेवणार नाहीत आणि त्यांच्याशी लग्नही करणार नाहीत असा होता. हे आंदोलन सोशल मीडियाद्वारे सुरू करण्यात आले नव्हते.
दरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच आपत्कालीन गर्भनिरोधक औषधांची मागणीही झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, गर्भनिरोध औषधे बनवणाऱ्या कंपन्यांनी म्हटले आहे की, 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान आत्पाकलीन गर्भनिरोध गोळ्यांच्या विक्रीमध्ये 1000% ने वाढ झाली आहे. या कालावधीत 1650 % टक्के लोकांनी खरेदी केली आहे. तसेच, गर्भपाताच्या औषधाची विक्रीही 600% टक्क्याने वाढली आहे.
ट्रम्प यांनी गर्भपाताचे अधिकार संपवण्याचे समर्थन केले
ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकन महिलांमध्ये त्यांचे गर्भपाताचे अधिकार अधिक कडक होतील अशी भीती वाटते. याआधी 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा अधिकार रद्द केला होता. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायलयाने या निर्णयाचे समर्थन केले होते. यामुळे अमेरिकन महिलांमध्ये पुन्हा एकदा हा अधिकार रद्द करण्यात येईल अशी भिती निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांच्या गर्भपात अधिकारावर परिणाम होईल असे अमेरिकन महिलांचे म्हणणे आहे.
हे देखील वाचा- ‘God Bless America’ कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन झाले भावुक; नेमके कारण काय?
एका सर्वेक्षणानुसार, 50% पेक्षा जास्त महिलांनी सुरक्षित गर्भपात आणि आरोग्य सेवा उपलब्ध नसल्यची चिंता होती. या अहवालात सांगण्यात आले आहे की, या कारणास्तव महिला त्या राज्यांमध्ये जाण्याच विचार करत आहेत जिथे गर्भपाताशी संबंधित कायदे सोपे आहेत. तसेच त्यांनी स्रव संबंधित सेवा उपलब्ध आहेत. याशिवाय, अनेक कंपन्या आणि ऑनलाईन सेवांद्वारे महिलांना घरपोच गर्भनिरोधक गोळ्या मिशळत असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
अमेरिकेच्या इतिहासात गर्भपातावर अनेकदा बंदी घालण्यात आली आहे
युएसमध्ये याआधी 1880 पर्यंत गर्भपाताला कायदेशीर मान्यता होती. त्यानंतर 1873 मध्ये गर्भपाताच्या औषधांवर बंदी घालण्यात आली. ही बंदी जवजवळ 1900 सालापर्यंत सर्व राज्यांमध्ये घालण्यात आली होती. गर्भधारणेमुळे आईच्या जीवाला धोका असेल तर गर्भपात करण्यास परवानगी होती. नंतर अमेकिन महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी 160 च्या दशकात याविरोधात चळवळ सुरू केली.
मिळालेल्या माहितीनुसार, नॉर्मा मॅककॉर्वे यांनी 1969 मध्ये ग्रभपात कायद्यासाठी चळवळ सुरू केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयापर्यंत पोहोचले आणि 1973 मध्ये या कायद्याला मंजुरी मिळाली. मात्र आता 24 जून 2024 पासून अमेरिकेत हा का.दा रद्द करण्यात आला आहे. यानंतर महिलांचे गर्भपात हक्क संपुष्टात येण्याची भिती अमेरिकन महिलांच्यात निर्माण झाली आहे. यामुळए याविरोधात अनेक आंदोलने सुरू आहेत.