Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War: ‘शस्त्रे सोडली होती, पण आता पुन्हा उचलेन’ Maduro अटकेनंतर आता या’ देशाच्या राष्ट्राध्यक्षांचाही ट्रम्पला युद्धाचा इशारा

Colombia On US: व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या कारवाईनंतर आता कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उघड आव्हान दिले आहे. 'या' विधानामुळे बोगोटा (कोलंबियाची राजधानी) मध्ये राजकीय अशां

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 07, 2026 | 09:20 AM
us colombia crisis gustavo petro warning to trump maduro arrest aftermath 2026

us colombia crisis gustavo petro warning to trump maduro arrest aftermath 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या अटकेनंतर आता कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना “हिंमत असेल तर या, मी वाट पाहतोय” असे थेट आव्हान दिले आहे.
  •  एकेकाळी गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पेट्रो यांनी देशाच्या सार्वभौमत्वासाठी पुन्हा एकदा शस्त्रे उचलण्याची आणि ‘जॅग्वार’प्रमाणे जनतेचा रोष उफाळून येईल अशी स्पष्ट चेतावणी दिली आहे.
  •  ट्रम्प यांनी कोलंबियाला “आजारी नेत्याद्वारे चालवला जाणारा देश” असे संबोधत तिथे लष्करी कारवाई करण्याचे सूतोवाच केले आहे, ज्यामुळे दक्षिण अमेरिकेत युद्धाचे सावट गडद झाले आहे.

Gustavo Petro vs Donald Trump 2026 : दक्षिण अमेरिकेतील राजकारण सध्या एका अत्यंत स्फोटक वळणावर येऊन ठेपले आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये घुसून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर आता अमेरिकेचा पुढचा टार्गेट कोलंबिया असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो (Gustavo Petro) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना धडकी भरवणारा इशारा दिला आहे. “जर तुमच्यात हिंमत असेल तर या, मी इथेच तुमची वाट पाहत आहे,” अशा कडक शब्दांत पेट्रो यांनी ट्रम्प यांच्या लष्करी धमकीला उत्तर दिले आहे.

ट्रम्प यांचे गंभीर आरोप आणि ‘लष्करी कारवाई’चे संकेत

डोनाल्ड ट्रम्प यांनी एअर फोर्स वनवरून पत्रकारांशी बोलताना कोलंबियावर बोचरी टीका केली होती. ट्रम्प म्हणाले की, “कोलंबिया हा एका अशा आजारी नेत्याद्वारे चालवला जात आहे जो अमेरिकेला कोकेन पुरवतो.” इतकेच नाही तर, व्हेनेझुएलाप्रमाणे कोलंबियामध्येही लष्करी कारवाई करणे ही एक ‘चांगली कल्पना’ असू शकते, असे विधान करून ट्रम्प यांनी युद्धाचे संकेत दिले. ट्रम्प यांच्या या विधानामुळे कोलंबियाची राजधानी बोगोटामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Old Rock Day 2026: खडक नाही, तर पृथ्वीचा जिवंत इतिहास! 7 जानेवारी ‘ओल्ड रॉक डे’ निमित्त उलगडलं 4 अब्ज वर्षे जुन्या खडकांचं रहस्य

“मी पुन्हा शस्त्रे उचलेन!” : गुस्तावो पेट्रो यांचा पवित्रा

गुस्तावो पेट्रो हे स्वतः एकेकाळी ‘M-19’ या डाव्या विचारसरणीच्या गनिमी गटाचे सदस्य होते. १९८९ च्या शांतता करारावेळी त्यांनी शस्त्रे सोडण्याची शपथ घेतली होती. मात्र, ट्रम्प यांच्या धमकीनंतर त्यांनी सोशल मीडियावर (X) पोस्ट करत म्हटले की, “मी शांततेची शपथ घेतली होती, पण जर माझ्या देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का लागला, तर मी माझ्या मातृभूमीसाठी पुन्हा एकदा शस्त्रे उचलेन.” पेट्रो यांनी इशारा दिला की जर अमेरिकेने हल्ला केला, तर इथली जनता ‘जॅग्वार’प्रमाणे आक्रमक होईल आणि अमेरिकन सैन्याला मोठ्या गनिमी काव्याला (Guerrilla Warfare) सामोरे जावे लागेल.

🚨 🇨🇴 🇺🇸 BREAKING: Gustavo Petro openly challenges Donald Trump, saying: “If you want to jail me, try and see if you can. If you want to put me in an orange uniform, try it. The Colombian people will take to the streets to defend me.”pic.twitter.com/XcCuyjG5ea — Jackson Hinkle 🇺🇸 (@jacksonhinklle) January 4, 2026

credit : social media and Twitter

कोकेन आणि निर्बंधांचे जुने राजकारण

अमेरिका आणि कोलंबिया यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यांपासून ताणले गेले आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये अमेरिकेने पेट्रो आणि त्यांच्या कुटुंबावर ड्रग्ज तस्करीच्या आरोपावरून निर्बंध लादले होते. कोलंबिया हा जगातील सर्वात मोठा कोकेन उत्पादक देश असल्याने अमेरिका याकडे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न म्हणून पाहत आहे. मात्र, पेट्रो यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत ट्रम्प यांना ‘साम्राज्यवादी’ म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Hypnotism Day : श्रीकृष्णालाही अवगत होती ‘संमोहन’ कला; वाचा कास जागृत केलं जातं अवचेतन मनात लपलेल्या ‘या’ प्रचंड शक्तीला

व्हेनेझुएलानंतर आता कोलंबियाची पाळी?

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने एका गुप्त मोहिमेद्वारे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना त्यांच्याच घरातून उचलून न्यूयॉर्कमध्ये आणले. मादुरो यांनीही अटकेपूर्वी ट्रम्प यांना अशाच प्रकारे आव्हान दिले होते. आता पेट्रो यांनी दिलेले आव्हान पाहता, अमेरिका खरच कोलंबियामध्ये लष्करी हस्तक्षेप करणार का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कोलंबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत “आम्ही कोणत्याही धमकीला बळी पडणार नाही” असे स्पष्ट केले आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुस्तावो पेट्रो आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वादाचे मुख्य कारण काय आहे?

    Ans: ट्रम्प यांनी पेट्रो यांच्यावर कोकेन तस्करीचे आणि अमेरिकेला ड्रग्ज पुरवण्याचे आरोप केले आहेत, तर पेट्रो यांनी याला अमेरिकेचा साम्राज्यवाद आणि देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला म्हटले आहे.

  • Que: कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष 'पुन्हा शस्त्रे उचलेन' असे का म्हणाले?

    Ans: पेट्रो हे माजी गनिमी योद्धा (Guerrilla) आहेत. अमेरिकेने लष्करी कारवाईची धमकी दिल्याने, त्यांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी पुन्हा सशस्त्र संघर्षात उतरण्याचा इशारा दिला आहे.

  • Que: व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने काय कारवाई केली?

    Ans: ३ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकन विशेष दलाने व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये घुसून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक केली.

Web Title: Us colombia crisis gustavo petro warning to trump maduro arrest aftermath 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • International Political news

संबंधित बातम्या

US-India Relation: अमेरिका-भारत संबंधात वाढणार आणखी तणाव! भारतावर आर्थिक कुरघोडीची तयारी?
1

US-India Relation: अमेरिका-भारत संबंधात वाढणार आणखी तणाव! भारतावर आर्थिक कुरघोडीची तयारी?

तेलावरुन पेटले आंतरराष्ट्रीय राजकारण! डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट केले निकोलस मादुरो यांचे अपहरण
2

तेलावरुन पेटले आंतरराष्ट्रीय राजकारण! डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट केले निकोलस मादुरो यांचे अपहरण

कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात
3

कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?
4

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.