India-Bangladesh Border Tension between BGB and BSF over push in at kurigram border
ढाका: अलीकडे भारताने देशात बेकायदेशीरपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींना परत पाठवण्याची मोहीम सुरु केली आहे. याअंतर्गत ४ मे २०२५ पासून शेकडो लोकांना परत पाठवण्यात आले आहे. दरमन्यान पुन्हा एकदा बांगलादेशींनी सीमा ओलांडून देशात घुसण्याचा प्रयत्न केला यामुळे भारत आणि बांगलादेश सीमेवर तमापूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२७ मे) सकाळी आसाम-बांग्लादेश सीमेवर दोन्ही देशांच्या जवानांमध्ये चकामक झाली.
बांगलादेशींना परत पाठवण्याचा प्रयत्न
मीडिया रिपोर्टनुसार, दोन वेगवेगळ्या भागात कुरीग्रामच्या बोराईबारी आणि आसामच्या मानकाचरच्या भारतीय सीमा सुरक्षा दल (बीएएसएफ) आणि बांग्लादेश सीमा रक्षकांमध्ये (बीजीबी) आमने-सामेन आले.बीएसएफचे जवान १४ लोकांना नो-मॅन्स लॅंडमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या ९ पुरुष आणि ५ महिलांना बांगलादेशात परत पाठवण्याचा प्रयत्न करत होते.
यावेळी बांगलादेशच्या बीजीबी सैन्याने अडथळ आणण्याचा प्रयत्न केला. बीएसएफच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार केला. परंतु बीजीबीने हा दावा फेटाळला असून परिस्थिती शांतपणे हाताळण्यात आली असल्याचे म्हटले आहे. सीमा ओलांडताना काही बांगलादेशी लोकांना पकडण्यात आले होते. हे लोक अजूनही नो-मेन्स लॅंडमध्ये अडकलेले आहे.
तसेच सोमवारी (२६ मे) आसामच्या मानकाचर सेक्टरच्या ठाकुरनबारी सीमेवरही तणावपूर्ण परिस्थिती आहे. या ठिकाणी देखील दोन्ही देशांचे सैन्यात गोळीबार झाला. बीजीबीनेही धक्काबुक्की थांबवण्याचा प्रयत्न केला तर बीएसएफने शून्य रेषेवर गोळीबार केला. काही काळासाठी संपूर्ण परिस्थिती बिकट झाली होती.
सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनचे उच्च अधिकारी घटनास्थली पोहोचले आहत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी तणाव कायम आहे. या सर्व घटना अशा वेळी घडत आहे, जेव्हा बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. तसेच दिवसेंदिवस भारत आणि बांगलादेशात तमाव वाढत आहे. परिस्थिती अत्यंत नाजूक आहे.
सध्या बांगलादेशात राजकीय गोंधळ सुरु आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तसेच बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे. या तणावादरम्यान मोहम्मद युनूस यांनी राजकीय डाव खेळला आहे.
युनूस यांनी हिंदूंबद्दल भाष्य केले आहे. त्यांनी हिंदूंच्या सुरक्षेला आणि इतर अल्पसंख्यांकीयांच्या सुरक्षेला प्राधान्य देणाची ग्वाही दिली आहे. यामागेच युनूस यांचा नेमका हेतू काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण सध्या युनूस यांच्या सरकारला पाडण्याची बांगलादेशात तयारी सुरु आहे.