India-China Relations China conducts combot exercise near LAC in Eastern Ladakh
बिजिंग: भारत आणि चीनमध्ये सध्या LAC वर शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. पुन्हा एकदा सीमेजवळ चीनच्या लष्करी हालचाली सुरु झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) नियंत्रण रेषेजवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कॉम्बॅट ड्रिल केली आहे. चीनने ही कृती अशा वेळी केली आहे, दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
सीमा भागात अजनही अनिश्चितता कायम
2020 साली गलवान घाटीमध्ये झालेल्या संघर्षानंतर निर्माण झालेल्या तणावावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनने 21 ऑक्टोबर 2024 रोजी एक करार केला. या करारानुसार देपसांग आणि डेमचोकसारख्या संवेदनशील भागांमध्ये गस्ती पुन्हा सुरू करण्याचे ठरले. हा करार दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जातो. तरीही, सीमा भागात अजूनही अनिश्चितता कायम असून मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात आहे.
चीनचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
चीनचा हा सराव केवळ नियमित प्रशिक्षणाचा भाग नसून त्यामागे धोरणात्मक विचार असल्याचे म्हटले जात आहे. चीनच्या या युद्धाभ्यासात ड्रोन आणि मानवविरहित प्रणालींचा वापर केला जात आहे. या भागांमध्ये एक्सोस्केलेटनसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला जात आहे. हा सराव चीनच्या रणनीतीचा भाग असून विवादित क्षेत्रांमध्ये जलदगतीने सैन्य तैनात करण्याचे उद्दिष्ट आहे.
विशेष म्हणजे चीनची ही कृती अशा वेळा करण्यात आली आहे जेव्हा दोन्ही देशांत गस्ती घालण्यासाठी महत्त्वाचा करारावर सहमती झाली आहे. देपसांग आणि डेमचोक भागांमध्ये गस्त घालणे सुरु करणे भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणा झाल्याचे चिन्ह आहे. मात्र, चीनकडून सतत होणार सैन्य सराव, दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करणे अवघड होत आहे.
भारत-चीन सीमेवरील तणाव
भारत-चीन सीमावाद हा अनेक वर्षापासून सुरु आहे. मुद्दा आहे. LACवरील चीनचे सैन्य सराव आणि विविध करारांनंतरही तणाव अद्यापही आहे. भारताने सतर्क राहून आपली सैन्य तयारी अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे, यामुळे कोणत्याही संभाव्य आव्हानांना सामोरे जाता येईल. सध्या चीनच्या या कृतीने भारत-चीन संबंध पुन्हा बिघडणार असल्याची शक्यता आहे. यापूर्वी एस. जयशंकर यांनी संगितले होते की, भारत-चीन मध्ये सध्या 75% वाद सोडवण्यात आले आहेत. त्यांनी म्हटले होते, चीनसोबत सीमेवरील सैन्याच्या माघारीशिवाय अजूनही अनेक मुद्यांवर भारतासमोर आव्हाने आहेत. चीनसोबतचा भारतास इतिहास अडणींचा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- हाती लागलं सोन्याचं घबाड; पाकिस्तानचे दिवस पालटणार?