India-China relations India approve visa for chinies citizens for first time after corona
नवी दिल्ली: भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सध्या भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याअंतर्गत भारताने चिनी नागरिकांना पर्यटनासाठी व्हिसा देण्याची घोषणा सरकारने केली आहे. दोन्ही देशांतील लोकांमध्ये संपर्क वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
बिजिंगमधील भारतीय दूतावासाने बुधवारी या निर्णयाची माहिती दिली. 2020 च्या कोविड-19 च्या कालावधीत चीनी नागरीकांसाठी सर्व पर्यटक व्हिसा काही काळासाठी निलंबित करण्यात आले होते. मात्र, पाच वर्षानंतर भारताने पुन्हा एकदा चीनी नागरिकांसाठी व्हिसा सेवा सुरु केली आहे.
Bangladesh Plane Crash : विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढतोय; ओळख पटवणं देखील कठीण
बीजिंगमधील भारतीय दूतावासाने संबंधित नोटीस जारी केली आहे. यामध्ये व्हिसासाठी लागणाऱ्या कागपत्रांची माहिती देण्यात आली आहे. व्हिसा केंद्रात पार्सपोर्टसाठी अर्ज करताना, पासपोर्ट विथड्रॉवल लेटर आवश्यक असल्याचे दूतावासाने म्हटले आहे. तसेच व्यावसायिकांना आणि विद्यार्थ्यांना हा व्हिसा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र सामान्य प्रवासावर अजूनही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोविड-19 चीनमधून पसरला होता. त्यानंतर भारत आणि चीनमध्ये हिंसक संघर्ष झाला. यामुळे दोन्ही देशांतील पर्यटन संबंध पूर्णत: थांबले होते. आता ही सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
याशिवाय १९६२ च्या युद्धानंतर, गलवान व्हॅलीतील संघर्षामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक बिघडले होते. राजनैतिक संबंधांमध्ये देखील दरी निर्माण ढाली होती. सध्या दोन्ही देशांतील संबंध पुनर्वत होत आहे.
भारत आणि चीनच्या राजनैतिक आणि लष्करी चर्चामध्ये दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यावर भर दिला जात आहे. या चर्चा यशस्वी होताना देखील दिसत आहे. चीनने पँगोंग लेक, गलवान आणि हॉटॉ स्प्रिंग्सच्या सीमावर्ती भागातून सैन्य माघार घेण्यास सुरुवात केली आहे.
याशिवाय २०२४ मध्ये देप्सांग आणि डेमचोक भागातूनही सैन्य माघारी बोलवण्यात आले आहे. दरम्यान रशियाच्या काझान येथे पंतप्रधान मोदींनी चीनच्या अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली आहे. शिवाय भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील चीनला भेट दिली आहे. सध्या दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी चर्चा सुरु आहे.
याअंतर्गत भारत आणि चीनच्या नागरिकांमध्ये संबंध वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न सुरु केला आहे. यासाठी दोन्ही देशांमध्ये थेट विमानासेवा सुरु करण्यासत आली आहे. तसेच कैलास मानसरोवर यात्रा देखील पुन्हा सुरु करण्याची योजना आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये सुधार होत असल्याचे एस. जयशंकर यांनीही म्हटले आहे.