Bangladesh Plane Crash : विमान अपघातातील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ; मृतदेहांची ओळख पटवणे देखील कठीण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका बांगलादेशात नुकत्याचा झालेल्या अपघाताने संपर्ण देशात गोंधळ उडाला आहे. या अपघातातील मृतांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. आतापर्यंत ३२ मतदेह आढळल्याची माहिती समोरी आली आहे. शिवाय १७० हून अधिक लोक जखमी झाले आहे. अपघातानंतर मृतदेहांची ओळख पटवणे देखील कठीण झाले आहे. आतापर्यंत केवळ एकाच कुटुंबाने डीएने नमुना दिला आहे. सध्या या घटनेने बांगलादेशात मोठा गोंधळ उडाला आहे.
बांगलादेशच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या नातेवाईकांचे डीएनए नमुने गोळा केले जात आहेत. लवकरच मृतदेहांची ओळख पटवली जाईल असे मंत्रालयाने म्हटले आहे. यासाठी ओळख प्रक्रिया जलद करण्यासाठी नागरिकांना मदतीनेचे आणि डीएनए देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, सीआयडी प्रयोगशालेत डीएनए प्रोफाइलिंग केले जाणार आहे.
या अपघातानंतर लोकांमध्ये तीव्र रोष वाढत आहे. मोहम्मद युनूस यांच्याविरोधात आणि अंतरिम सरकारविरोधात कारवाईची मागणी देखील केली जात आहे. निदर्शनांना रोखण्यासाठी पोलिसांच्या कारवाई दरम्यान ७५ विद्यार्थी जखमी झाले आहे. त्यांना ढाकातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी (२२ जुलै) ढाकाच्या मुख्य सचिवालयाबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने काढण्यात आली. यामध्ये अंतरिम सरकारच्या शैक्षणिक सल्लागार आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान अंतरिम सरकारच्या कायदेशीर आणि शिक्षक सल्लागारांना विद्यार्थ्यांचा तीव्र रोष सहन करावा लागत आहे. अपघातानंतरच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी अधिकारी आले असताना विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे.
याच वेळी अवामी लीग पक्षाने अंतरिम सरकारवर गंभीर आरोप केले आहे. अवामी लीग पक्षाने एक निदेन जारीर करत, माइलस्टोन स्कूल आणि कॉलेजमध्ये लढाऊ विमान कोसळल्यापासून विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. अंतरिम सरकार मृतांची संख्या लपवत आहे, तसेच परिस्थिती हातळण्याऐवजी लोकांवर ग्रेनेड, अश्रूदुराचा वापर केला जात आहे. अंतरिम सरकार राष्ट्रापती जबाबादारी घेण्याच अपयशी ठरले आहे.
सध्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या मनावर मानसिक आघात होत आहे. निदर्शकांना रोखण्यासाठी सरकार सुरक्षा दलांचा वापर करत आहे. लोकांपासून त्यांच्या नातेवाईकांची माहिती लपवली जात आहे, असेही अवामी लीगने म्हटले आहे. या आरोपांमुळे सध्या बांगलादेशात परिस्थिती बिघडत चालली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाकडे अंतरिम सरकारच्या दडपशाही विरोधात कारवाईची मागणी केली जात आहे.