Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India China Tension : भारतासाठी धोक्याची घंटा! चीनचे Spy Ship बंगलाच्या उपसागरात; नौदल हाय अलर्टवर

China Spy Ship Bay of Bengal : भारताच्या सागरी सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. चीनच्या हेरगिरी जहाजाने बंगालच्या उपसागरात एन्ट्रीन घेतली आहे. यामुळे भारतीय नौदलाला हाय अलर्ट देण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 03, 2026 | 11:59 AM
China Spy Ship Shi Yan 6 Bay of Bengal

China Spy Ship Shi Yan 6 Bay of Bengal

Follow Us
Follow Us:
  • चीनच्या हेरगिरी जहाजाची बंगलाच्या उपसागरात एन्ट्री!
  • भारताच्या सागरी सुरक्षेला धोका?
  • नौदल हाय अलर्टवर
China Spy Ship Shi Yan 6 Bay of Bengal : नवी दिल्ली/बीजिंग : चीनचे ‘Shi Yan 6’ हे एक हेरगिरी जहाज नुकतेच बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे. यापूर्वी, हे हेरगिरी जहाज मालदीवमध्ये थांबले होते. तिथे आपल्या रसद आणि साहित्याची पूर्तता केल्यानंतर ते पुन्हा एकदा आपल्या मोहिमेवर निघाले आहे. हे चिनी हेरगिरी जहाज अंदमान आणि निकोबार बेटांच्या अगदी जवळच्या परिसरात कार्यरत आहे. हे चिनी हेरगिरी जहाज भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘ग्रेट निकोबार प्रकल्पा’साठी धोका निर्माण करू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

चीनदेखील अंदमान आणि निकोबार बेटांच्या जवळ एक कालवा बांधण्याची योजनाही आखत असल्याचे वृत्त आहे. हा कालवा दक्षिण चीन समुद्र आणि अंदमान समुद्र यांना जोडणारा असेल. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल अलर्टवर आहे. भारतासाठी बंगालच्या उपसागराचे प्रचंड धोरणात्मक, आर्थिक आणि भौगोलिक महत्त्व आहे; आग्नेय आशियाशी संपर्क साधण्यासाठी तो एक मुख्य प्रवेशद्वार म्हणून कार्य करतो.

भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’ अंतर्गत हा प्रदेश भारताला म्यानमार आणि थायलंड, इंडोनेशियासारख्या राष्ट्रांशी जोडतो; तसेच हिंदी महासागराद्वारे होणाऱ्या जागतिक व्यापारासाठी तो एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग ठरतो. बंगालचा उपसागर एका संरक्षक ढाल म्हणून कार्य करतो आणि भारताच्या पूर्व सीमेवरील सुरक्षेला बळकटी देतो. हा उपसागर ‘मलाक्का सामुद्रधुनी’चे प्रवेशद्वार म्हणून काम करतो, जी भारताच्या सागरी व्यापारासाठी एक अत्यंत महत्त्वाची जीवनवाहिनी आहे.

‘ग्रेट निकोबार प्रकल्प’ म्हणजे काय ?

  • भारत सध्या अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या अगदी दक्षिणेकडील टोकावर स्थित असलेल्या बेटावर ‘ग्रेट निकोबार प्रकल्प’ विकसित करत आहे.
  • या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ७५,००० ते ८१,००० कोटीच्या दरम्यान आहे. ग्रेट निकोबारला एक प्रमुख ‘सागरी केंद्र म्हणून विकसितकेले जाणार आहे.
  • या प्रकल्पामध्ये एका विशाल आंतरराष्ट्रीय कटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल, ‘ग्रीनफील्ड’ विमानतळ, एक नागरी वसाहत आणि एका वीज प्रकल्पाची उभारणी केली.

‘शी यान ६’ जहाजाविषयी

  • Shi Yan 6 हे चीनचे एक आधुनिक वैज्ञानिक संशोधन जहाज आहे. याची लांबी ९०.६ मीटर आणि रुंदी १७मीटर आहे.
  • २०२० मध्ये बांधण्यात आलेले हे जहाज सागरी, भूगर्भीय आणि पर्यावरणीय सर्वेक्षणे करते.
  • शी यान ६’ कडे हिंदी महासागर क्षेत्रात भारताच्या लम्करी क्षमतांवर पाळत ठेवणारे एक हेरगिरी जहाज म्हणूनच पाहते.
  • हे जहाज हिंदी महासागराची खोली, समुद्राच्या तळाची रचना आणि सागरी प्रवाहांची माहिती गोळा करण्यास सक्षम आहे.
  • ही माहिती त्यानंतर चिनी पाणबुड्यांकडून वापरली जाते.

भारतासाठी बंगालचा उपसागर महत्त्वाचा का आहे?

बंगालचा उपसागर भारत आणि आग्नेय आशियाला जोडणार मुख्य सागरी मार्ग आहे. हा हिंद महासागरातील व्यापार, उर्जा सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि चीनला रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. हा महासागरा भारतासाठी धोरणात्मक, आर्थिक आणि भौगिलिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.

Web Title: India china tension china spy ship shi yan 6 bay of bengal india on alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • China
  • India China Relation
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.