Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

POK वाचवण्यासाठी पाकिस्तानची ‘नवी चाल’; भारतावर दबाव आणण्यासाठी चीनला खेचले मैदानात

भारत सातत्याने आणि ठामपणे पाकव्याप्त काश्मीर (POK) वर आपला सार्वभौम हक्क सांगत असताना, पाकिस्तानने एक नवा आणि धोकादायक खेळ मांडला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 16, 2025 | 10:50 AM
India claims POK Pakistan involves China in Kashmir

India claims POK Pakistan involves China in Kashmir

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद/नवी दिल्ली – भारत सातत्याने आणि ठामपणे पाकव्याप्त काश्मीर (POK) वर आपला सार्वभौम हक्क सांगत असताना, पाकिस्तानने एक नवा आणि धोकादायक खेळ मांडला आहे. पहिल्यांदाच पाकिस्तानने काश्मीर वादात चीनला थेट पक्ष म्हणून सामील असल्याचे जाहीर केले आहे, आणि त्यामुळे या वादाला आंतरराष्ट्रीय स्वरूप येण्याची चिन्हं आहेत.

पाकिस्तान इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक अहमद शरीफ चौधरी यांनी स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे म्हटले की, “काश्मीर वादात केवळ भारत आणि पाकिस्तानच नाही, तर चीन देखील एक पक्ष आहे.” या विधानामुळे आश्चर्याचा धक्का बसला असून, पाकिस्तानने पीओकेच्या मुद्यावर चीनचा हात धरल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारताचा पीओकेवर दबाव आणि पाकिस्तानची अस्वस्थता

अलीकडच्या काळात भारत सरकारने पीओकेवर जोरदार भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही पीओकेबाबत कठोर भूमिका घेतली असून, “आता चर्चा फक्त पीओकेच्या पुनर्प्राप्तीचीच असेल,” असा स्पष्ट इशारा दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानची ही प्रतिक्रिया म्हणजे भारताच्या दबावाला उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा रोष अधिक तीव्र झाला आहे. अशा वेळी पाकिस्तानने चीनचा आधार घेत हा वाद आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कोणता डाव खेळतेय अमेरिका? पहलगाम हल्ल्यापूर्वी ट्रम्प आणि पाक लष्करप्रमुखांमध्ये झाली होती ‘Crypto Deal’

चीनचा प्रवेश, दोन महत्त्वाची कारणे

पाकिस्तानच्या या धोरणामागे दोन मुख्य कारणे स्पष्ट दिसतात 

1. चीनच्या मदतीने सैनिकी बळ वाढवणे:

चीन हा पाकिस्तानचा सर्वात जवळचा आणि प्रभावशाली सहयोगी देश आहे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानने ८१ टक्के शस्त्रे चीनकडूनच खरेदी केली आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये फक्त चिनी हवाई संरक्षण प्रणालीच कार्यरत आहे. त्यामुळे भारताशी संघर्ष वाढल्यास, चीनची मदत मिळवण्यासाठी पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यात त्याला पक्ष म्हणून ओढले आहे.

2. चीनची पीओकेमधील गुंतवणूक:

चीनने पीओकेमध्ये सुमारे $३०० दशलक्ष गुंतवले आहेत. ही गुंतवणूक मुख्यतः चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पांतर्गत झाली आहे. जर भारताने पीओकेमध्ये कोणतीही लष्करी कारवाई केली, तर या गुंतवणुकीला धोका निर्माण होईल. त्यामुळेच पाकिस्तानने चीनलाच वादात सामील करून घेतले, जेणेकरून भारतावर राजनैतिक व आंतरराष्ट्रीय दबाव वाढवता येईल.

भारताची सावध पावले आणि कूटनीतिक युद्ध

भारताने या संपूर्ण घडामोडींवर शांतता राखली असली, तरी राजकीय आणि लष्करी पातळीवर भक्कम रणनीती आखण्यात आली आहे. पीओकेवरील दावा आता केवळ शब्दांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर भारत जागतिक व्यासपीठावरही हा मुद्दा अधिक जोमाने मांडत आहे.

तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानने चीनला या वादात सामील करून घेतल्याने भारताला कदाचित तात्पुरता धोका निर्माण होईल, पण या कृतीमुळे पाकिस्तान स्वतःच अधिक एकटा होण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर अनेक देश पाकिस्तानच्या दहशतवादासंदर्भातील भूमिकेमुळे आधीच नाराज आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने केला पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त’, माजी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याचा खुलासा

 काश्मीर वादाला नवे वळण, पण भारत ठाम

पाकिस्तानची ही नवी चाल म्हणजे पीओकेवरील भारतीय दबावाला उत्तर देण्याचा हतबल प्रयत्न आहे. मात्र, चीनच्या मदतीनेही पाकिस्तान भारताच्या निर्धारापुढे टिकेल का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. एक गोष्ट मात्र निश्चित – भारताची पीओकेवरील भूमिका अधिक स्पष्ट, ठाम आणि निर्णायक होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर, येणारे काही महिने काश्मीर वादाच्या इतिहासात निर्णायक ठरू शकतात.

Web Title: India claims pok pakistan involves china in kashmir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • China
  • india
  • india pakistan war
  • international news
  • Uripok

संबंधित बातम्या

 FDI Investment: नव्या वर्षात एफडीआय वाढीचा भारताला आत्मविश्वास, ८० अब्ज डॉलर्सचा टप्पा केला पार
1

 FDI Investment: नव्या वर्षात एफडीआय वाढीचा भारताला आत्मविश्वास, ८० अब्ज डॉलर्सचा टप्पा केला पार

‘या’ चिनी टेक कंपनीच्या इनोव्हेशनला मानला बॉस! डेव्हलप केली अशी बॅटरी जी देईल 3000 किमी रेंज
2

‘या’ चिनी टेक कंपनीच्या इनोव्हेशनला मानला बॉस! डेव्हलप केली अशी बॅटरी जी देईल 3000 किमी रेंज

भारताची 2026 मध्ये गरुडझेप! तोडणार FDI चे रेकॉर्ड; मेगा डिल्स अन्…
3

भारताची 2026 मध्ये गरुडझेप! तोडणार FDI चे रेकॉर्ड; मेगा डिल्स अन्…

गुरु शिष्यांची कमाल! प्लॉस्टिक बॉटलपासून बनवलं रॉकेट, चीनमधील Video Viral
4

गुरु शिष्यांची कमाल! प्लॉस्टिक बॉटलपासून बनवलं रॉकेट, चीनमधील Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.