Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunita Williams : अंतराळातून भारत कसा दिसतो? सुनीता विल्यम्स यांनी एकाच शब्दांत दिलं उत्तर

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर 9 महिन्यानंतर अतंराळातून सुखरुप परतले. दरम्यान अंतराळातून पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 01, 2025 | 10:53 AM
'India is amazing' Sunita Williams shares experience how the country looks from space VIDEO

'India is amazing' Sunita Williams shares experience how the country looks from space VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर 9 महिन्यानंतर अतंराळातून सुखरुप परतले. दरम्यान अंतराळातून पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली. सुनीता विल्यम्स यांनी त्यांना अंतराळातून सुखरुप परत आणल्याबद्दल, नासा, स्पेसएक्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. या पत्रकार परिषदेत दोन्ही अंतराळवीरांनी अंतराळात घालवलेल्या नऊ महिन्यांचा अनुभव शेअर केला.

सुनीता विल्यम्स यांनी म्हटले की, पृथ्वीवर परत आल्याचा अनुभव अत्यत सुखद आहे. आता त्या पुनर्वसन प्रक्रियेत आहे आणि नव्या आव्हानांसाठी सज्ज आहेत. त्यांनी आम्ही पुन्हा उड्डाण भरण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी अंतराळातून भारताकडे पाहाताना विलक्षण असे दृश्य अनुभवायला मिळाले असेही म्हटले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पृथ्वीवर तर आली पण प्रकृतीचे काय? सुनीता विल्यम्सची प्रकृती चिंताजनक, फोटो आले समोर

पृथ्वीवर परतण्याचा अनुभव

सुनीता विल्यम्स यानी म्हटले की, पृथ्वीवर परत्यानंतर त्याना पहिल्यांदा आपल्या पतीला मिठी मारण्याची इच्छा होती. घरी परत्यानंतर त्यानी सर्वप्रथम ग्रिल्ड चीन सँडविच खाल्ले.

तसेच त्यांनी अंतराळातून पृथ्वीकडे पाहातानाचा अनुभव देखील सांगितला. त्यांनी म्हटले की, अंतराळातून भारताकडे पाहाताना त्यांना हिमालय आणि भारतातील इतर भागांचे अद्धभुत रंग पाहायला मिळाले, जे अत्यंत आश्चर्यकारक होते.दिवस आणि रात्र दोन्ही वेळी पृथ्वीकडे, भारताकडे पाहण्याचा विलक्षणीय अनुभव पाहायला मिळाले.

“India is amazing.” More from Suni in this clip: pic.twitter.com/M2ajvyAen9 — NASA (@NASA) March 31, 2025

आरोग्याबाबत भाष्य

अंतराळात दीर्घकाळ राहिल्यामुळे दोन्ही अंतराळवीरांसाठी शारीरिक आव्हाने निर्माण झाल्याचे सुनीता विल्यम्स यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की, अंतराळयात्रेनंतर स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो आणि हाडांचे नुकसान होते. परंतु योग्य काळजी घेऊन या अडचणी दूर करता येतात. अतराळवीर बुच विल्मोर यांनी सांगितले की, स्नायूंचा कमकुवतपण आणि हाडांची झीज कमी करण्यासाठी तज्ज्ञांची टीम त्यांना मदत करत आहे.

सुनीता विल्यम्स भारताला भेट देणार?

पत्रकार परिषदे दरम्यान एका भारतीय पत्रकाराने विचारलेल्या भारतीय भेटीबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना विल्यम्स यांनी मत व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, त्या लवकरच भारताला भेट देणार आहे. त्यांच्या म्हणण्यांनुसार अतराळ संशोधन क्षेत्रात भारताची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. भारताची उपस्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत आहे. अंतराळातून भारताला पाहिल्यानुसार, भारताच्या छोट्या-मोठ्या शहरांमध्ये दिव्यांची रोशनी पाहायला मिळाली. रात्रीच्या वेळी हे दृश्य अविश्वसनीय वाटत होते.

तसेच सुनीता विल्यम्स यानी म्हटले की, हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतांना अंतराळातून पाहणे विलक्षणीय होते. अंतराळ स्थानकात असताना दोन्ही अतंराळवीरांनी त्यांच्या कामावर लक्ष्य केंद्रित केले. त्यांना बाहेरच्या जगातील गोष्टींबद्दल काही माहित नव्हते, मात्र त्याना खात्रा होती की ते सुरिक्षतपणे पृथ्वीवर परततील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘गरज पडली तर मी माझ्या खिशातून देईन…’; सुनिता विल्यम्सच्या ओव्हरटाईम पेमेंटवर ट्रम्प यांची प्रतिक्रिया

Web Title: India is amazing sunita williams shares experience how the country looks from space video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 10:39 AM

Topics:  

  • NASA
  • Space News
  • Sunita Williams

संबंधित बातम्या

ड्रॅगन पोहचणार चंद्रावर! 2030 पर्यंत चीनची चंद्रावर जाण्याची तयारी झाली पूर्ण? जाणून घ्या
1

ड्रॅगन पोहचणार चंद्रावर! 2030 पर्यंत चीनची चंद्रावर जाण्याची तयारी झाली पूर्ण? जाणून घ्या

Universe Mystery: अनंत आहे अंतराळ! सूर्यमालेत सापडला नववा रहस्यमय ग्रह; अज्ञात विश्वाच्या अस्तित्वाचे संकेत
2

Universe Mystery: अनंत आहे अंतराळ! सूर्यमालेत सापडला नववा रहस्यमय ग्रह; अज्ञात विश्वाच्या अस्तित्वाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.